Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड कुछ तो गळबळ है! सनी कौशल शर्वरी वाघसोबत गेला डिनर डेटवर, पाहा व्हिडिओ

कुछ तो गळबळ है! सनी कौशल शर्वरी वाघसोबत गेला डिनर डेटवर, पाहा व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेता सनी कौशल आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या डेटिंगच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. नुकतेच सनी आणि शर्वरी एका डिनर डेटवर स्पॉट झाले होते. सनी आणि शर्वरी दोघेही खूप आनंदी दिसत होते. पॅपराजीचा विनंतीचा मान राखत दोघाही एकत्र, तर आले. मात्र कपल पोज सोबत दिले नाहीत. दोघेही एकमेकांजवळ उभे राहून हसत असताना क्लिक झाले.

सनी कौशल(Sunny Kaushal) आणि शर्वरी(Sharvari Wagh) डिनरसाठी त्यांच्या मित्रांसह पोहोचले होते. यादरम्यान शर्वरीने काळ्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा शॉर्ट ड्रेस घातला होता. त्याचवेळी सनीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा पॅन्ट घातला होता. शर्वरीने पॅपराजीला आधी सोलो पोज दिली आणि नंतर सनीसोबत देखील फोटोसाठी पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 विकी-कॅटरिनाच्या लग्नात उपस्थित होती शर्वरी
सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’मध्ये एकत्र काम केले होते. येथूनच दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडला आणि दोघांची भेट होऊ लागली. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच शर्वरी सनीचा भाऊ विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नातही दिसली होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे शर्वरी
शर्वरी वाघ अखेरची सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटात दिसली होती. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. दुसरीकडे, सनी कौशलबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 2010 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात केली. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. वेब सीरिजच्या जगातही तो सक्रिय आहे आणि आपल्या अभिनयाच्या बळावर चात्यांच्या मनावर राज्य करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, दिल्ली कोर्टात बंदीच्या मागणीची याचिका दाखल

केबीसीमध्ये जया बच्चन यांनी केला असा खुलासा, बिग बीच्या अश्रूचा बांध फुटला!

हे देखील वाचा