Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोल्हापूरमधील जोडप्यासाठी ‘वाय’ सिनेमा ठरला प्रेरणादायी, डायरेक्ट थिएटरमध्येच उरकलं बारसं

काही दिवसांपूर्वीच ‘वाय’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. स्त्रीभृण हत्येबाबात सांगणाऱ्या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले आहे. पण कोल्हापूरमधील दाम्पत्याने या चित्रपटापासून प्रेरित होऊन चक्क आपल्या मुलीचा नामकरण विधीच थिएटरमध्येच पार पाडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Y The Film (@ythefilm)

सई राजशिर्के-देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने कोल्हापूरमध्ये वाय चित्रपटाचा विशेष शो आयोजित करत त्यांच्या मुलीचा नामकरण विधी केला. त्यांनी मुलीचे मुक्ता नाव ठेवलं. या नावामागे कारण म्हणजे अशी मुलगी जिला बंधन नाही आणि दुसरं कारण म्हणजे ‘वाय’ फेम अभिनेत्री मुक्ता बर्वे. याबद्दल मुक्ता बर्वेच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा