Friday, July 5, 2024

शीजानला परदेशात जाण्यासाठी काेर्टाने दिली परवानगी, ‘या’ प्रसिद्ध शाेमध्ये झळकणार अभिनेता

वसई न्यायालयाने शीझान खान याला त्याच्या व्यावसायिक आयुष्याचा विचार करून कामानिमित्त देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा म्हणाले, ‘खतरों के खिलाडी‘ शोसाठी शीजनला परदेशात जाण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आभार मानू इच्छितो.’

वसई न्यायलयाच्या निर्णयावर अभिनेता शीजन खान (sheezan khan) म्हणाला, ‘माझा कोर्टावर पूर्ण विश्वास होता. जस्टिस कधीही मरत नाही.” न्यायालयाच्या सुनावणीवेळी शीजानची बहीण फलक नाजही उपस्थित होती. ती म्हणाली, ‘माझा भाऊ पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभा आहे आणि तो आता त्याच्या येणा-या आयुष्यासाठी कमाई करू शकणार आहे याचा मला खूप आनंद आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)

माध्यमातील वृत्तानुसार, शीझान खान लवकरच रोहित शेट्टीच्या स्टंट शो ‘खतरों के खिलाडी सीझन 13’चा भाग असू शकतो. शोच्या निर्मात्यांना कोणतेही उत्तर देऊ न शकल्याने अभिनेता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)

मंडळी, शीझान खानला त्याची को-स्टार तुनिषा शर्माच्या आत्म’हत्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. तुनिषाच्या आईने अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता की, त्याच्यामुळे त्यांची लाडकी लेक तुनिषा हिने आत्म’हत्या केली आहे. तुनीषाने टीव्ही शाेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये आत्म’हत्या केली हाेती. घटनेच्या 70 दिवसांनंतर शीजनची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.(court grants permission sheezan khan to travel abroad for work will be seen in khatron ke khiladi )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्मेंद्र यांच्या घरी लवकरच वाजणार सनई! सनी देओलच्या मुलाने गुपचूप केला साखरपुडा?

नर्गिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने काढली आईची आठवण, बहीण प्रियाने शेअर केला ‘ताे’ भावनिक व्हिडिओ

हे देखील वाचा