Tuesday, July 9, 2024

वादग्रस्त ट्वीट करणे अभिनेत्रीला पडले महागात; अंधेरी येथील न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

अभिनेत्री पायल रोहतगीने जामिया मिल्लिया इस्लामियाची विद्यार्थी सफूरा जरगरच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केले होते. या प्रकरणी मुंबईच्या अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन न्यायालयाने अभिनेत्रीच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत पोलिसांना याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वास्तविक, जून 2020 मध्ये जामियातून एम. फिल. केलेली सफुरा जरगर दिल्ली दंगलीच्या संदर्भात तुरूंगात होती आणि त्यावेळी ती गर्भवतीही होती. त्यादरम्यान पायलने तिच्या ट्विटमध्ये सफुराच्या धर्मावर निशाणा साधलेला पाहायला मिळाला होता.

आता याप्रकरणी पायलच्या ट्विटविरोधात, मुंबईचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. यानंतर डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी अंधेरी कोर्टात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि एफआयआर दाखल करावा अशी मागणीही केली.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी म्हणाले की, न्यायालयाला पायल रोहतगी यांचे ट्वीट मुस्लिम महिलांचा आणि या संपूर्ण समुदायाचा अपमान करणारे आढळून आले आहे. मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी भागवत जीरापे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, “प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा हक्क आहे आणि इतर कोणत्याही समाजातील रीती किंवा नियमांची खिल्ली उडविण्याचा कोणालाही अधिकार नाही.”

न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, “रोहतगीच्या ट्विटवर तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे, जेणेकरुन आरोपीविरूद्ध कारवाई होऊ शकेल आणि अशी तपासणी केवळ पोलिसच करु शकतात.” या व्यतिरिक्त सोशल मीडियावर या ट्विटनंतर अभिनेत्री पायल रोहतगीवर बरीच टीका झाली होती. इतकेच नव्हे तर ट्विटरवरुन तिचे अकाउंटही निलंबित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंद गगनात मावेना! ‘गुड बाय’ चित्रपटात बिग बींच्या पत्नीची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

-अजबच! श्रीदेवीची को- स्टार प्रिया आनंदचा कारमध्ये किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मिळाले १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

हे देखील वाचा