Wednesday, July 3, 2024

काय होता तुम्ही, काय झालात तुम्ही! अमिताभ स्वत:च करतायेत टॉयलेट साफ, कपडे धुण्याचीही आलीय वेळ

काही दिवसांपूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, ते चाहत्यांशी जोडले राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देत असतात. आता त्यांनी एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, कशाप्रकारे नवीन स्टाफला गोष्टी समजावण्यात अडचण होत आहे आणि यामुळे ते त्यांचे सर्व काम स्वत:च करत आहेत. त्यांच्यासाठी हे सर्व काम स्वत: करणे वेगळा अनुभव आहे. मात्र, हे काम एन्जॉय करत असल्याचे ते सांगतात.

टॉयलेट करत आहेत साफ
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “कोरोनामुळे आता स्वत:च स्वत:चे बेड तयार करत आहे. स्वत:च कपडे धुवत आहे, फरशी पुसत आहे आणि टॉयलेटही धुवत आहे. यासोबतच जे स्विच आहे, ते स्वत:च बंद करत आहे. स्वत:साठी चहा-कॉफी बनवत आहे. सर्व मोबाईल आणि फोनला स्वत:च प्रतिसाद देत आहे. माझे पत्र स्वत:च लिहीत आहे. तसेच, नर्स स्टाफकडून स्वत:च गोळ्या घेत आहे. आजकाल असंच आयुष्य आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

‘तरीही येतेय मजा’
अमिताभ यांच्या या पोस्टवरून असे दिसते की, ते हे सर्व काम एन्जॉय करत आहेत. ते म्हणाले की, “हे खूपच मजेशीर आणि स्वत:ला समाधान देणारा अनुभव आहे. हे चांगले आहे की, कर्मचार्‍यांवर अवलंबून राहणे कमी होत आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे, जसे मी यापूर्वी अनेकदा मांडले आहे की, तुमचे कर्मचारी दिवसभर काय सहन करतात. तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे.”

अमिताभ यांचे आगामी सिनेमे
अमिताभ बच्चन हे शेवटचे ‘रनवे 34’ या सिनेमात झळकले होते. आता त्यांच्या ताफ्यात अनेक सिनेमे आहेत, जे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यामध्ये ‘ब्रह्मास्त्र’, ‘गुड बाय’, ‘प्रोजेक्ट के’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘बॉलिवूडसाठी तेलुगू इंडस्ट्री सोडण्याचा दम नव्हता’, हिंदी सिनेमांबद्दल ‘शिवगामी देवी’चे धक्कादायक विधान
प्रसिद्ध अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप; म्हणाला, ‘मी तर नामर्द आहे’
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल

हे देखील वाचा