Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शर्टलेस’ आयुषमान खुरानावर फिदा झाली त्याचीच पत्नी! फोटो शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आज त्याच्या प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य करतो. आयुषमान खुरानाने स्वत: आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याची पत्नी ताहिरा कश्यपही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि सतत पती आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर करते राहते. अलीकडेच अभिनेत्याच्या पत्नीने त्याचा एक फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत आयुषमानने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आहेत. यासह त्याची फॅन फॉलोविंगही सतत वाढत आहे. हेच कारण आहे की, अभिनेत्याचे कोणतेही फोटो पोस्ट होताच ते व्हायरल होऊ लागतात.

ताहिराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आयुषमान शर्टलेस स्टाईलमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये तो पावसाळ्याच्या काळात शर्टलेस अवतारात पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोमधील अभिनेत्याचा अंदाज पूर्णपणे किल्लर आहे.

एवढेच नाही तर ताहिराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला आवडणार्‍या सर्व गोष्टी! चहा, पुस्तक, लॅम्प, स्टडी टेबल, पाऊस आणि हा हॉट मुलगा.” अभिनेत्याचा हा फोटो ताहिराने थोड्या दुरून घेतला आहे. पण आपण पाहू शकतो की, यात आयुषमान चष्मा घालून पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे आणि त्याच्या पाठीमागे पाऊस पडत आहे.

अभिनेत्याचा हा शर्टलेस फोटो पाहून, चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. आयुषमानचा फोटो जलद गतीने व्हायरल होत असून, चाहते यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आयुषमान लवकरच वाणी कपूरसोबत ‘चंडीगड करे आशिकी’मध्ये दिसणार आहे. यासह तो दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या ‘अनेक’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेता ‘डॉक्टर जी’ मध्येही झळकणार आहे. ताहिराबद्दल बोलायचे झाले, तर ती चित्रपटांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि प्रत्येक विषयावर तिचे मत मांडताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

हे देखील वाचा