Wednesday, June 26, 2024

‘कौन बनेगा करोडपती १३’चा पहिला शुक्रवार ‘शानदार’ करत हे दोन दिग्गज क्रिकेटर देणार अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना उत्तरं

येत्या काही दिवसांतच सामान्यांना करोडपती बनवणारा सर्वांचा आवडता ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू होत आहे. या शोचा १३ वा सीझन आता सुरू होणार आहे. या पर्वाचा प्रोमो अतिशय भावनिक आणि हृदयस्पर्शी होता. जेव्हा पासून या शोचे रेजिस्ट्रेशन झाले तेव्हापासूनच हा शो सुरु कधीपासून होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मात्र आता येत्या २३ ऑगस्ट पासून हा स्वप्नांना सत्यात उतरवणारा केबीसी हा शो सुरु तर होणार आहे, मात्र या पर्वात या शोमध्ये खूप मोठे आणि महत्वाचे बदल करण्यात आले आहे.

मागच्या पर्वात प्रत्येक शुक्रवार ‘कर्मवीर शुक्रवार’ म्हणून साजरा केला जायचा, मात्र आता ह्या पर्वात हाच शुक्रवार ‘शानदार’ होणार आहे. प्रत्येक आठवड्याचा शुक्रवार हा ‘शानदार शुक्रवार’ म्हणून साजरा केला जाईल. या भागात खास पाहुणे हॉटसीटवर येऊन अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांचे उत्तरे देणार आहेत. आता तुम्हाला नक्कीच परष पडला असेल मग केबीसी सुरु झाल्यानंतर पहिल्या शुक्रवारी शो मध्ये कोण खास पाहुणे येणार आहे?

तर कौन बनेगा करोडपती या शोच्या पहिल्या शानदार शुक्रवारी दोन ‘शानदार’ क्रिकेटर हजेरी लावणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि सौरभ गांगुली हे भारतीय क्रिकेटची शान असणारे दोन दिग्ग्ज कलाकार येणार आहेत. हा भाग २७ ऑगस्टला दाखवला जाणार आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

ह्या पर्वात शोमध्ये पाच मोठे बदल केले आहे, सोबतच प्रेक्षकांना शोमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘ऑडियंस पोल’ लाईफलाईन पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. फिंगर फर्स्ट हे या पर्वात दिसणार नाही. त्याऐवजी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट- ट्रिपल टेस्ट’ हे असणार आहे. यात स्पर्धकांना तीन प्रश्न विचारले जाणार तिन्ही पारशांचे कमीतकमी वेळात उत्तर देणारा स्पर्धक हॉटसीटवर जाईल.

शो मध्ये असणारी लाईफलाईनमध्ये देखील बदल करण्यात आले आहे. शोमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असल्याने शोमध्ये ‘ऑडियंस पोल’ लाईफलाईन पुन्हा दिसणार आहे. शिवाय खेळात असणाऱ्या टायमरचे नाव ‘धुक-धूकी जी’ठेवण्यात आले आहे. यासंपूर्ण शोची मदार खांद्यावर असणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे खुमासदार सूत्रसंचालन शोला चार चाँद लावणार यात मुळीच शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

 

हे देखील वाचा