बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांच्या ‘बेसोस’ या नवीन म्युझिक व्हिडिओचा टीझर ६ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. या टीझरमध्ये जॅकलिन तिच्या आकर्षक नृत्याने पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसत आहे, तर शिखर धवन त्याच्या स्टायलिश लूकने चर्चेत आहे.
हे गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि आंतरराष्ट्रीय कलाकार कार्ल वाईन यांनी गायले आहे. चाहते या अनोख्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यास उत्सुक आहेत. संपूर्ण गाणे ८ मे रोजी सकाळी ११ वाजता प्ले डीएमएफच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होईल.
‘बेसोस’चा टीझर रंगीत आणि भावनिक वातावरणाने भरलेला आहे. टीझरमध्ये जॅकलिनच्या दमदार नृत्याच्या हालचाली आणि शिखरचा कूल अवतार चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी, दोघांनीही इंस्टाग्रामवर गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पॉप का तडका, पॅशन का रंग. बेसोससाठी तुम्ही तयार आहात का? उद्या फक्त प्ले डीएमएफ यूट्यूब चॅनेलवर टीझर. संपूर्ण गाणे ८ मे रोजी सकाळी ११ वाजता.”
‘बेसोस’ गाण्याचे बोल राणा सोटल, फ्रीबॉट आणि कार्ल वाईन यांनी लिहिले आहेत. संगीत रजत नागपाल, फ्रीबॉट आणि कार्ल वाईन यांनी दिले आहे. या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन पियुष-शाझिया या जोडीने केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
48 व्या देखील वर्षी मल्लिका शेरावत इतकी फिट कशी काय? जाणून घ्या सिक्रेट