भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. या कारणामुळेच त्यांची कोणतीही पोस्ट येताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. युझवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मजेदार व्हिडिओवर दोघांच्या चाहत्यांचे लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओमध्ये युझी आणि धनश्री एका डायलॉगवर लीप्सिंग करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, धनश्रीने युझवेंद्रसाठी जेवणाचे ताट धरले आहे आणि “बटाट्याचे गरम गरम पराठे” म्हणत आहे. ज्यावर युझी म्हणतो की, “यात बटाटा कुठे दिसतोय?” मग धनश्री म्हणते, “काश्मिरी पुलावमध्ये तुला काश्मीर दिसतं का… आणि बनारसी साडीत बनारस दिसतं का?” या व्हिडिओमध्ये धनश्रीने नाईट सूट परिधान केला आहे. तर युझवेंद्र हाफ स्लीव्ह टी-शर्टमध्ये दिसत आहे. अल्पावधीतच या व्हिडिओला ९ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर कमेंट करताना धनश्रीने लिहिले, “नाही, तू हे पोस्ट करायला नव्हतं पाहिजे.”
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी २०२० मध्ये लग्न केले. दोघांचे हे लग्न चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. युझवेंद्र भारतीय क्रिकेट संघाचा सुप्रसिद्ध खेळाडू आहे, तर धनश्री व्यवसायाने डॉक्टर आणि कोरियोग्राफर आहे. धनश्रीला डान्स करायला आवडतो. ती अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. ते चाहत्यांना खूप आवडतात.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्या लग्नाची लव्हस्टोरी ही खूप लोकांना माहिती नसेल. पण यांची लव्हस्टोरी बॉलिवूड चित्रपटांसारखीच आहे. त्यांची लवस्टोरी चित्रपटासाखीच पुढे रंगत गेली होती. धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू ट्यूबरपैकी एक आहे. ती एक उत्तम डान्सर आहे. ती तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडयावर शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज