Saturday, January 31, 2026
Home टेलिव्हिजन धनश्री, महवश आणि शेफाली बग्गासोबत युजवेंद्र चहल चित्रपट करत आहे? व्हायरल AI पोस्टरवर क्रिकेटरची प्रतिक्रिया..

धनश्री, महवश आणि शेफाली बग्गासोबत युजवेंद्र चहल चित्रपट करत आहे? व्हायरल AI पोस्टरवर क्रिकेटरची प्रतिक्रिया..

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. 2025 मध्येच त्याचा कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाला. अवघ्या पाच वर्षांपूर्वी झालेलं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघे वेगळे झाले. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच चहल अनेकदा आरजे महवशसोबत दिसू लागला, त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या. मात्र अलीकडेच दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने ब्रेकअपच्या अफवा सुरू झाल्या.

दरम्यान, अलीकडेच युजवेंद्र चहलला बिग बॉस 13 फेम शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आणि ते डेटिंग फेजमध्ये असल्याचं बोललं जाऊ लागलं. याच दरम्यान सोशल मीडियावर चहल, धनश्री वर्मा, आरजे महवश आणि शेफाली बग्गा यांचा एक AI-जनरेटेड पोस्टर व्हायरल झाला. या पोस्टरला शीर्षक देण्यात आलं होतं — ‘किस किस को प्यार करूं 3’.

व्हायरल होत असलेल्या या पोस्टरमध्ये युजवेंद्र चहलसोबत त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा, आरजे महवश आणि शेफाली बग्गा दिसत आहेत. कपिल शर्मा स्टारर ‘किस किस को प्यार करूं 2’ मधील लव्ह ट्रायंगलच्या धर्तीवर हा पोस्टर तयार करण्यात आला आहे. हा पोस्टर ग्राफिक डिझायनर विजय कुमार बरिया यांनी शेअर केला होता आणि तो चहलच्या नजरेसही पडला.

या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना चहलने (chahal)मजेशीर कमेंट केली, “२-३ अजून राहिल्यात अ‍ॅडमिन, पुढच्या वेळी नीट रिसर्च करून या. म्हणजे अजून काही नावं मिसिंग आहेत.” चहलची ही प्रतिक्रिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

चहलच्या या कमेंटवर युजर्सही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याच्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, “भाऊ, ट्रेलर कधी लॉन्च होतोय?” तर दुसऱ्याने लिहिलं, “तुझ्यावर FIR होईल.” आणखी एका युजरने मजेत म्हटलं, “भाऊ, फिल्ममध्ये मला पण कास्ट करा.”

दरम्यान, धनश्री वर्मा अलीकडेच अशनीर ग्रोवरच्या ‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने युजवेंद्र चहलसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. कुब्रा सैतसोबत संवाद साधताना धनश्रीने चहलने आपल्याशी विश्वासघात केल्याचा संकेत दिला होता. तिच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच तिला याची जाणीव झाली होती. मात्र चहलने धनश्रीचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अक्षय कुमारला गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूरची धमकी? १ कोटींची मागणी, सेटवरचा फनी व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा