Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

गंदी बात! अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीला क्राइम ब्रँचकडून अटक

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठला नुकतीच क्राइम प्रॉपर्टी ब्रँच सेलने अटक केली आहे. गेहनावर एका वेबसाइटवर अ‍ॅडल्ट (अश्लील) व्हिडिओ शूट करून अपलोड करण्याचा आरोप आहे. मुंबई पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला आज मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात येईल. अन्य मॉडेल्स, साइड अभिनेत्री आणि काही प्रॉडक्शन हाऊसच्या सहभागावरही पोलीस नजर ठेवून आहेत. गेहना वशिष्ठ यापूर्वीदेखील बर्‍याच वेळा चर्चेत राहिली आहे. वादांशी तर तीचे जुने नाते असल्यासारखेच झाले आहे.

मिस आशिया बिकिनीची विजेती असलेली गेहना हिने बऱ्याच जाहिराती तसेच काही हिंदी व तेलगू चित्रपटांत काम केले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तिने 87 अश्लील व्हिडिओ शूट करून ते आपल्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत, ज्यांना पाहण्यासाठी सदस्यता आवश्यक आहे. चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना त्यासाठी 2 हजार रुपये द्यावे लागतात.

गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, शहरातील मालाड-मालवणी भागात माढ येथील बंगल्यात छापा टाकल्यानंतर दोन पुरुष अभिनेते, एक लाईट मॅन, एक महिला फोटोग्राफर आणि एक ग्राफिक डिझायनर यांना अटक करण्यात आली आहे, तेव्हा हे लोक मोबाइल फोनवरून एक अश्लील फिल्म शूट करत होते.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाने, घटनास्थळावरून सहा मोबाइल फोन, एक लॅपटॉप, कॅमेरा आणि संबंधित उपकरणे, मेमरी कार्ड इ. जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत जवळपास 5.68 लाख रुपये आहे. तसेच त्यांनी आरोपींच्या खात्यावर जमा असलेले 36.30लाख रुपये देखील जप्त केले आहेत.

गेहना यापूर्वीही बर्‍याच वेळा चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडच्या चिमरी गावात झाला. गेहनाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये रस होता. 2012 साली तिने मिस आशिया बिकिनीचे विजेतेपदही जिंकले होते.

सन 2020 मध्ये गेहना वशिष्ठ बरीच चर्चेत आली होती, जेव्हा सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये गेहनाने तिच्या कंबरेखाली तिरंगा लपेटला दिसून आला होता. शिवाय ती अतिशय कामुक शैलीत पोज देतनाना दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर मुंबईतील काही लोकांनी गेहनाला मारहाण देखील केली होती. या व्हिडिओवर गेहनाने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, ‘हा व्हिडिओ तिच्या एका मित्राने अपलोड केला आहे.’ तथापि, हा तिचा प्रसिद्धी स्टंट देखील असल्याची तेव्हा चर्चा झाली होती.

गेहना अल्ट बालाजीच्या वेब सिरिज ‘गंदी बात’ मध्ये दिसली होती. या व्यतिरिक्त तिने स्टार प्लस वरील ‘बेहेनें’ या मालिकेमध्येही काम केले आहे. गहना वशिष्टने आतापर्यंत 70-80 जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच 30 दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. तिने छोट्या पडद्यावर क्रिकेट विश्वचषक 2015 मध्ये योगराज सिंग आणि अतुल वासनचा शो देखील होस्ट केला होता. त्यांच्या या कार्यक्रमाला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा-

‘न्यूड’ फोटोच्या मागणीला अभिनेत्री पूजा हेगडेची जबरदस्त प्रतिक्रिया; एकदा पाहाच

“‘केजीएफ: चाप्टर २’ केवळ चित्रपट नाही तर…”, चाहत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; सोशलवर भन्नाट व्हायरल

हे देखील वाचा