Friday, July 5, 2024

बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण

सोनी टिव्हिवरील ‘क्राईम पट्रोल’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक भयंकर गुन्ह्यांच्या कथा दाखवल्या जातात. गुन्हेगारी जगताचे  दर्शन या मालिकेतून घडवले जाते. मात्र आता या मालिकेच्या निर्मात्यांनाच फसवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ. मुंबईच्या मालाड पोलिस ठाण्यात याबद्दलची सविस्तर दाखल करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आणि अभिनेता जीशान कादरीच्या विरोधात गॅंग्स ऑफ वासेपुरच्या निर्मात्याने ३८ लाखाची कार चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा क्राईम पट्रोल या मालिकेच्या निर्मात्यांनी दाखल केला आहे. या अभिनेत्यावर फक्त त्यांची ऑडी कार चोरल्याचा नव्हेतर ते एका वर्षापासुन फोन न उचलल्याचा तसेच त्यांची कार १२ लाखाला गहाण ठेवण्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

मालाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुन २०२१ रोजी जिशान कादरीने क्राईम पट्रोलचे निर्माते राजबाल ढाका चौधरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला एका कॉमेडी कार्यक्रमाची ऑफर दिली होती. त्यानंतर याच कार्यक्रमासाठी निर्मीती पार्टनर म्हणूनही त्यांना मनवले होते. परंतु यामध्येच त्यांची मोठी फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याने मिटींगसाठी कार हवी असल्याचे सांगत त्यांच्याकडून कार मागून घेतली. मात्र कार दिल्यानंतर जीशानने त्यांच्याशी संपर्क करण्याचे सोडून दिले. वर्ष उलटून गेले तरी त्याने ती कार परत केली नसल्याने तसेच कार गहाण ठेवल्याची माहिती समोर आल्याने त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.

हेही वाचा – किती तो ओव्हर कॉन्फिडन्स? ‘लायगर’ बॉयकॉट होत असताना देखील विजय देवरकोंडा म्हणतोय, ‘आता धमाका होणार’
रिलीजपूर्वीच लिक झाली ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची कथा, रणबीर कपूरला बसणार मोठा धक्का
‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला

 

 

हे देखील वाचा