Wednesday, July 3, 2024

संपुर्ण यादी- क्रिटिक चॉइस अवॉर्ड्स पुरस्कारांची घोषणा, स्कॅम १९९२ वेबसिरीजसह ‘या’ कलाकृतींना मिळाले पुरस्कार

नवीन वर्ष सुरु झाले की मनोरंजन विश्वात पुरस्कारांचं वारे वाहू लागतात. वर्षभर सर्व कलाकार आणि पडद्यामागील तंत्रज्ञ मेहनतीने काम करत असतात. नवीन वर्ष सुरु झाले की त्या सर्वांना त्यांच्या मेहनतीची एक शाबासकीची थाप म्हणून पुरस्कारांनी गौरवले जाते. २०२१ वर्ष सुरु होऊन दिड महिना झाला, तरी अजून पुरस्कार सोहळे होताना दिसत नाही. मात्र या वर्षी कोरोनामुळे एकदम साध्या आणि छोटेखानी समारंभात हे सोहळे होत आहे.

नुकताच क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स सोहळा संपन्न झाला. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्व भाषांमधील चांगल्या फिचर फिल्म, वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्समधील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान केला जातो. यात यावर्षी अनेक चांगल्या कलाकृतींनी बाजी मारली. त्यांचीच संपुर्ण यादी आपण पाहाणार आहोत.

यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे.

शॉर्ट फिल्म्स :

सर्वश्रेष्ठ शॉर्ट फिल्म- बेबाक
सर्वश्रेष्ठ निर्देशक- शाजिया इकबाल बेबाक
सर्वश्रेष्ठ अभिनेता- आदिल हुसैन मील
सर्वश्रेष्ठ अभिनेत्री- अमृता सुभाष द बूथ
सर्वश्रेष्ठ लेखन- शाजिया इकबाल बेबाक

फिचर फिल्म्स :

सर्वश्रेष्ठ फिल्म- ईब आलै ऊ
सर्वश्रेष्ठ निर्देशक-  प्रतीक वत्स, ईब आलै ऊ
सर्वश्रेष्ठ अभिनेता- मनोज बाजपेयी, भोंसले
सर्वश्रेष्ठ अभिनेत्री- तिलोत्तमा शोम, सर
सर्वश्रेष्ठ सह-अभिनेता- पंकज त्रिपाठी, गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल
सर्वश्रेष्ठ सह-अभिनेत्री- सई पल्लवी, पावा कधाइगल’ (तमिल)
सर्वश्रेष्ठ लेखन- साची,अयप्पनम कोशियम (मलयालम)
सर्वश्रेष्ठ सिनेमॅटोग्राफी- सिद्धार्थ दीवान, बुलबुल
सर्वश्रेष्ठ एडिटिंग- महेश नारायणन, सी यू सून (मलयालम)

वेब सीरीज

सर्वश्रेष्ठ वेब- सीरीज स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी
सर्वश्रेष्ठ अभिनेता- प्रतीक गांधी, स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी
सर्वश्रेष्ठ अभिनेत्री- सुष्मिता सेन, आर्या
सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता- अभिषेक बनर्जी, पाताल लोक
सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री- स्वास्तिका मुखर्जी, पाताल लोक
सर्वश्रेष्ठ लेखन- सुमित पुरोहित आणि सौरव डे, स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी

‘फिल्म क्रिटिक्स गिल्ड’ यांच्या चेयरपर्सन अनुपमा चोप्रा यांनी सांगितले की, ” मी या पुरस्कारांसाठी खूपच उत्साहित आहे. मागील वर्ष आपल्या सर्वांसाठीच खूप त्रासदायक होते. तरीही आम्ही अतिशय सुंदर आणि आशयसंपन्न कलाकृती पाहिल्या. सर्व विजेत्यांना खूप शुभेच्छा.”

मोशन कंटेंट ग्रुप इंडियाचे बिजनेस हेड सुदीप सान्याल म्हणतात, “कंटेंट क्रिएटर्सना आणि प्रतिभेला सन्मानित करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. मनोरंजन क्षेत्रातून आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.”

 

हे देखील वाचा