Monday, July 1, 2024

‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

कलाकारांच्या मानधनाबद्दल आजवर आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयानुसार आपले मानधन ठरवत असतो. अशात प्रत्येक ठिकाणी काम करण्याचे वेगवेगळे दर लावले जातात. छोट्या पडद्यावरील कलाकारांचे मानधन मोठ्या पडद्यावरील कलाकारांपेक्षा कमीच असते. बॉलिवूडमधील अनके कलाकार आपल्या अभिनयासाठी कोटींच्या घरातच मानधन घेतात. अशात सलखान खान त्याच्या मानधनामुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चा रविवार हा शेवटचा दिवस ठरला आहे. अशात सलमानच्या मानधनाचा मुद्दा सध्या चर्चेत आलाय. बॉलिवूडचा दबंग खान आपल्या दमदार अभिनयासाठी दमदार मानधन घेतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. अशात त्याने ‘बिग बॉस’ १५ साठी देखील दमदार मानधन घेतले आहे. परंतु त्याचे या शोसाठीचे मानधन ऐकून तुम्ही चकितच व्हाल. सुप्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सलमान या शोसाठी १४ आठवड्यांचे किती मानधन घेतो हे सांगण्यात आले आहे. तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की, सलमान खान या शोमध्ये फक्त १४ आठवड्यांसाठी ३५० कोटींचे मानधन घेतो हे सांगण्यात आले आहे. (Dabang khan is charging such a huge amount for big boss)

दबंग खानच्या या एवढ्या मोठ्या मानधनामुळे त्याला अनेकजण वेगवेगळ्या आणि टीकात्मक कमेंट्स करत आहेत. अशात एका युजरने लिहिले आहे की, “बापरे एवढे पैसे”, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “जर लोकांकडे एवढे पैसे आहेत तर, लोक ते पैसे असे वाया का घालवतायत?” तसेच आणखी एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “हा बोगस शो आहे.” अभिनेत्याच्या मानधनाची रक्कम ऐकून अनेकांनी त्याच्यासह ‘बिग बॉस’ शोला देखील ट्रोल केले.

नुकताच ‘बिग बॉस’ १५ चा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला. ज्यामध्ये सलमान खान मोकळ्या आकाशामध्ये आणि विश्वसुंदरीच्या झाडाला आरामदायक गोष्टींशिवाय स्पर्धकांचे आयुष्य किती कठीण आहे हे सांगत आहे. यामध्ये सलमान म्हणतो की, “स्पर्धकांची झोपण्यावरून एखाद्याला उठवण्यावरून भांडणे होतात. परंतु या घरामध्ये त्यांना सुखाची झोप लागणार आहे का विश्वसुंदरी?” यावर विश्वसुंदरी म्हणते की, “झोपण्याचा प्रश्नच येत नाही. जंगलातील वातावरण आणि येथील थंड हवा स्पर्धकांची झोपच उडवणार आहे.” बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना अजून किती कठीण गोष्टींचा सामना करावा लागणार याकडेच संपूर्ण चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा