Sunday, January 18, 2026
Home मराठी अभिनेत्री पूजा सावंतने चाहत्यांना एक दुःखद बातमी; आवडती गोष्ट गमावल्याचे दुःख केले जाहीर…

अभिनेत्री पूजा सावंतने चाहत्यांना एक दुःखद बातमी; आवडती गोष्ट गमावल्याचे दुःख केले जाहीर…

अभिनेत्री पूजा सावंत कायमच चर्चेत असते. आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत जागा मिळवणाऱ्या पूजाने आजवर अनेक चित्रपटांत कामे केली आहेत. पूजा सोशल मिडीयावर देखील अतिशय सक्रीय असते. आता तिने एक वाईट बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे. पूजा सध्या खूप दुखी आहे. त्याचे कारण म्हणजे पूजा जवळ असणारी तिची लाडकी मांजर नुकतीच मरण पावली आहे. 

अभिनेत्री पूजा सावंत हिला प्राणी खूप आवडतात. तिचे प्राणीप्रेम कधीही लपून राहिलेले नाही. आता तिच्या जवळच्या बेल्ला मम्मा या मांजरीचे निधन झाले आहे. याबाबत तिने सोशल मिडीयावर पोस्ट शेयर केली आहे.  ज्यामध्ये ती म्हणते, हे बरोबर नाही बेल्ला मम्मा… तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता पहिल्यासारखं राहणार नाही. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील.तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतंस. आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे. मी तुला पुन्हा भेटेन. रेस्ट इन पीस. या पोस्ट वर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

पूजाने क्षणभर विश्रांती या सिनेमातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. दगडी चाळ या सिनेमाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्याचबरोबर तिने हिंदी सिनेमांत देखील कामे केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात तिने सिद्धेश चव्हाण याच्याशी लग्न केले   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बिग बॉस १८ च्या स्पर्धकांची अधिकृत यादी आली समोर; काही प्रसिद्ध नावांचाही समावेश…

 

हे देखील वाचा