बॉलिवूड असो किंवा खेळ असो, या दोन्ही क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना असते. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन आणि भारतीय क्रिकेट संघातील वेगाने गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या लग्नाची अफवा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनुपमाने नुकतेच सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे आणि एक खूप मोठी पोस्ट लिहीली आहे.
अनुपनाने तिचा तिचा फोटो शेअर करून पोस्ट केली आहे की,” हा माझा आता पर्यंतचा सगळ्यात सुंदर फोटो नाहीये. हा कामातून थकल्यानंतरचा एक फोटो आहे. आणि मला असे वाटले की, हा फोटो मला तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. आता मला जे नाव, पैसा मिळत आहे ते फक्त तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आहे. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा एक संघर्ष आहे आणि मी ते खूपच एंजॉय करत आहे. मी तुम्हा सगळ्यांना वचन देते की, मी तुम्हा सगळ्यांना प्रभावित करण्यासाठी खूप चांगले काम करेल. सगळ्यांचे खूप खूप आभार.”
अनुपमाने आणखी एक फोटो शेअर करून ती राजकोटला जात असल्याची माहिती दिली आहे. पण यामध्ये तिने तिच्या आणि जसप्रीत बुबराह यांच्या लग्नाबाबतीत कोणतेही वक्तव्य केले नाही. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांच्या लग्नाची अफवा पसरवली होती, तेव्हा तिच्या आईने या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने असे सांगितले होते की, अनुपमा ही तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुजरातमध्ये गेली आहे. ती एका तेलगू चित्रपटाची शूटिंग करत आहे. तिच्या आणि बुमराहच्या लग्नाचा यात काहीही संबंध नाहीये.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या अथर्व यांचा ली पोगाथे या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाला ‘कन्न’ यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटात अमिताश प्रधान, कली वेंकट यांनी महत्वाची पात्र निभावली आहेत. गोपी सुंदर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.










