डान्स दिवाने या शोचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय परीक्षक असणारा तुषार कालिया नेहमीच चर्चेत असतो. त्याला कमालीची फॅन्स फॉलोविंग असून, त्याच्या डान्ससोबत फिटनेसचे देखील सर्वच दिवाने आहेत. मात्र सध्या तुषार लाईमलाइटमध्ये आला याचे एक वेगळेच कारण आहे आणि ते म्हणजे तुषारने त्याची मैत्रीण असलेल्या त्रिवेणी बर्मनसोबत साखरपुडा केला आहे. लवकरच तुषार रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या शोच्या शूटिंगसाठी जाण्यापूर्वी त्याने त्रिवेणीसोबत साखरपुडा केला आहे. सध्या या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याचे फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील लोकं त्याला त्याच्या या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत. या दोघांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला बिग बॉस १५ फेम निशांत भट्टने देखील हजेरी लावली होती. निशांतने देखील या जोडीचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिलॉंगमध्ये झालेल्या या साखरपुडयाच्या कार्यक्रमात तुषार आणि त्रिवेणी यांनी पांढऱ्या रंगला पसंती दिली. जिथे तुषारने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता तर त्रिवेणीने देखील पांढऱ्या रंगाची नेटची साडी नेसली होती. दोघेही एकमेकांसोबत खूपच छान दिसत होते. निशांतने त्याच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “परिवारात तुझे स्वागत आहे त्रिवेणी, माझा मित्र, माझा जिवलग, माझा भाऊ त्याला त्याच्या नवीन सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा. देव नेहमीच तुम्हाला सुखी ठेवो.” या साखरपुड्यासोबतच अजून एक विधी करण्यात आला त्या विधीसाठी या दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते.
या दोघांच्या साखरपुडयाच्या समारंभासाठी जवळच्या नातेवाईकांसह मित्र मंडळी देखील उपस्थित होते. यावेळी या दोघांनी एकमेकांना अंगठी घालण्यासोबतच डान्स केला आणि केक देखील कापला. त्रिवेणीने देखील या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “तू माझ्या आयुष्यात आला यापेक्षा अधिक चांगले काहीच होऊ शकत नाही.” तर तुषारने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “नवीन सुरुवातीसाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.”
तत्पूर्वी तुषारला डान्स दिवाने या शोने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. याआधी त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘झलक दिखला जा’च्या दोन पर्वांमधे नृत्यदिग्दर्शन केले. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘डान्स दीवाने’ या शोचे त परीक्षण करतो. तर त्रिवेणी बर्मन ही एक इंडियन ब्यूटी पेजेंट टाइटल जिंकणारी मॉडेल असून ती व्हिडिओ क्रिएटर देखील आहे. २०१७ साली झालेल्या FBB कलर्स फेमिना मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट देखील त्रिवेणी होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा