Tuesday, June 24, 2025
Home टेलिव्हिजन अंकिता लोखंडेने ‘गर्ल गॅंग’सोबत धरला ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘Cutness Overloaded!’

अंकिता लोखंडेने ‘गर्ल गॅंग’सोबत धरला ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘Cutness Overloaded!’

टेलिव्हिजनवर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखवून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) होय. अंकिता लोखंडेने १४ डिसेंबर रोजी तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी सात आयुष्य एकमेकांचा हात धरला आहे. लग्नानंतर अंकिताच्या सौंदर्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आयुष्याच्या या नव्या सुरुवातीमुळे अंकिता किती खूश आहे हे तिच्या चेहऱ्यावरील हास्यावरूनच समजते. तिच्या साध्या लूकमुळे ती अनेकदा तिच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देते. नुकताच अभिनेत्रीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली अंकिता लोखंडे नेहमी तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट शेअर करत असते. ती सतत नवनवीन फोटोशूट करुन त्यांना प्रभावित करत असते. त्याचबरोबर ती नवनवीन रिल्स देखील सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांमध्ये आग लावते. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओमधील अभिनेत्रीच्या डान्स मुव्ह्ज कौतुकास्पद आहेत. अभिनेत्री प्रत्येक डान्स मुव्ह फिल करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘सैय्या दिल मैं आना रे’ हे गाणे वाजत आहे.

अभिनेत्रीच्या आऊटफिट बद्दल बोलायचे झाले, तर अंकिताने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टी-शर्ट परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने मिनीस्कर्ट परिधान केला आहे. त्यासह अभिनेत्रीने केसांची पोनी घातली आहे. त्यास हलकासा मेकअप करून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीसोबत या व्हिडिओमध्ये अशिता धवन आणि नेहा बिजलानी देखील डान्स करताना दिसत आहेत.

मुंबईतील ग्रँड हयात येथे अंकिता आणि विकी यांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी हळदी, मेहंदी, संगीत असे विधी केले गेले. दोघांनीही त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

हेही वाचा –

हे देखील वाचा