Wednesday, August 6, 2025
Home मराठी “… तू माझा मार खाणार”, मुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारताच असं का बाेली गाैतमी पाटील? वाचा सविस्तर

“… तू माझा मार खाणार”, मुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारताच असं का बाेली गाैतमी पाटील? वाचा सविस्तर

आपल्या लावणीमुळे प्रसिद्धीच्या झाेत्यात आलेली नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील होय. गौतमीचा चागता वर्ग खूप माेठा आहे, पण तिच्या काही लावणी व्हिडीओंनंतर तिच्यावर अश्लील लावणी करत असल्याचा ठपका लावण्यात आला आहे. यामुळे गाैतमी पाटीलला अनेकदा माफीही मागावी लागली आहे. तसेच ट्राेलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र, तिने यात आपण सुधारणा करणार असल्याचही म्हटलं हाेतं.

गौतमी (gautami patil) तिच्या लावणीसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचं फॅमिली बॅकग्राउंड, तिचं शिक्षण माहित करून घेण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक असतात. अशातच तिने एक मुलाखत दिली आहे, ज्यादरम्यान तिने तिच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगाविषयी सांगितले. यादरम्यान तिने रॅपिड फायरमध्येही सहभाग घेतला. रॅपिड फायरदरम्यान तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, तिच्या एका उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

तर झाले असे की, रॅपिड फायरदरम्यान गाैतमीला विचारण्यात आले की, ‘एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?’ या दाेन्हीपैकी एकाची निवड करायची हाेती. मात्र, गाैतमीने यावर उत्तर देणे टाळले. तसेच “तू मला मार खायला लावणार की, तू माझा मार खाणार?” असे ती हसत गमतीत अॅंकरला म्हणाली.

मुलाखतीदरम्यान गाैतमी पुढे तिच्या व्हायरल व्हि़डिओबद्दलही बाेलली. ती म्हणाली, “तो व्हिडीओ मी स्वतः आईला पाठवला आणि झालेली हकीकत आईला सांगितली. कारण, तिला इतरांकडून कळालं असतं, तर तिला आणखी जास्त त्रास झाला असता. माझा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई खूप खचली होती, पण जवळच्या लोकांनी धीर दिला व सांभाळून घेतलं, असं गाैतमीने सांगितलं.(dancer gautami patil answer on rapid fire question about eknath shinde and uddhav thackeray)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा