Tuesday, August 5, 2025
Home मराठी वाढदिवस आहे बैलाचा अन् डान्स ठेवला गौतमीचा; काय आहे संपूर्ण प्रकरण? एकदा वाचाच

वाढदिवस आहे बैलाचा अन् डान्स ठेवला गौतमीचा; काय आहे संपूर्ण प्रकरण? एकदा वाचाच

डान्सर गौतमी पाटील ही सध्या चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी असो की, त्यामधील वाद यात काही नाविन्य राहिले नाही. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गाजतो. असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एका कार्यक्रमात घडला होता. एका कार्यक्रमात तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ती जोरदार चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या वडिलांनी गौतमीचा कार्यक्रम ठेवला होता. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. एका पैलवानाने चक्क त्याच्या बैलाचा वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमीचा डान्स ठेवला.

म्हणतात ना की हौसेला मोल नसते. साताऱ्यात बैलगाडा मालक आणि पैलवान असलेल्या सतीश भोसले यांनी त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. साताऱ्यातील खर्शी तालुक्यातील जावली या गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच निमित्ताने पुन्हा एकदा सातारकरांना पुन्हा एकदा गौतमीचा (gautami patil) जलवा बघायला मिळणार. अशातच सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील खर्शी येथील एका पैलवानाने बैलाच्या वाढदिवसाला गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे.

पैलवान सतीश भोसले यांचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्यांच्यासाठी त्यांचा बैल खुप खास आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी खैत्री खास करायचे म्हणून त्यांनी गौतमीचा डान्स ठेवायचा अस ठरवल.

गौतमी ही तिच्या अश्लील डान्समुळे तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. तिच्या कार्यक्रमांवर बंदी देखील घाल्य्नाची मागणी करण्यात आली. तसेच तिचा कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरही काही नेटकऱ्यांनी तिने जाणीवपूर्वक असे केले असेल अशी टीका केली तर काहींनी जे झाले ते चुकीचे आहे यावर तिला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत तिला पाठींबा देखील दिला. (dancer-gautami-patil-dance-organize-bulls-birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य सुंदरी झाल्या भोजपुरी चित्रपटांच्या ‘क्वीन’, आता आहेत तरी कुठे?
‘माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली…,’ महिलेचा खळबळजनक दावा

हे देखील वाचा