Sunday, June 8, 2025
Home अन्य एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण

एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण

हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सपना चौधरीने आपल्या अदाकारीने आणि डान्सने हरियाणवी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे, हरियाणवी गाणी आणि डान्स व्हिडिओ देशभरात ऐकले आणि पाहिले जातात. अनेक हरियाणवी गाणी अनेकदा यूट्यूबवर ट्रेंड होतात. या गाण्यांच्या व्हिडिओमध्ये डान्स करणारे कलाकार प्रेक्षकांची मने जिंकतात. असेच एक हरियाणवी गाणे आजकाल खूप पाहिले जात आहे. या गाण्याचे नाव आहे की, ‘तेरे बाप का जमाई.’

या गाण्यावर एक महिला डान्सर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या डान्सरचे नाव आर सी उपाध्याय असे सांगितले जात आहे. लोक उपाध्यायच्या ठुमक्यांचा खूप आनंद घेत आहेत. या गाण्यावर ती खूप एनर्जीसह डान्स करताना दिसून येते. याच एनर्जीसह ती रंगमंचावर सादरीकरण करताना दिसते. या गाण्यामध्ये दिसते की, अनेक लोक स्टेजवर बसले आहेत. त्याचवेळी, तेथे उपस्थित प्रेक्षक देखील गोंधळ घालत आहेत आणि तिच्या नृत्याचा आनंद घेत आहेत.

डान्सर आर सी उपाध्याय उत्कृष्ट डान्स करत असताना एक व्यक्ती उठतो आणि सर्व बसलेल्या प्रेक्षकांच्या मध्यभागी नाचू लागतो. आर सी उपाध्याय सुद्धा त्या व्यक्ती जवळ नाचताना दिसत आहे. उपाध्याय वेळोवेळी इतकी एनर्जी घेऊन नाचते की, स्टेजवर बसलेले त्यांचे साथीदारही आश्चर्यचकित होतात. तिची ही अदाकारी आणि तिचा डान्स पाहून सर्व लोक तिच्यावर फिदा होतात. या गाण्याला आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

स्टेजवर आर सी उपाध्यायसोबत अजूनही डान्सर डान्स करताना दिसत आहेत. त्यापैकी एक सुनीता बेबी. सुनीता बेबी सुद्धा खूप छान डान्स करते. तिची लोकप्रियता ही खूप जास्त आहे. आर सी उपाध्यायचा हा डान्स व्हिडिओ पाहून सर्वांना सपना चौधरीच्या स्टेज डान्सची आठवण येईल हे नक्की. सपना चौधरी प्रमाणेच आर सी उपाध्यायचा डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा