Thursday, April 24, 2025
Home अन्य डान्स परफॉर्मन्समध्ये सपना चौधरी नेहमी सूटच का घालते? ‘देसी क्वीन’नेच केला खुलासा

डान्स परफॉर्मन्समध्ये सपना चौधरी नेहमी सूटच का घालते? ‘देसी क्वीन’नेच केला खुलासा

छोट्या-छोट्या स्टेज शोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे (Sapna Choudhary) आयुष्य आज खूप आलिशान आहे. सपना सोशल मीडियावर एक प्रसिद्ध नाव आहे. ‘बिग बॉस’पासून सपनाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. सपनाच्या स्ट्रगलबद्दल सर्वांनाच माहिती आहे. सपनाने लहानपणापासूनच डान्स करायला सुरुवात केली होती. कारण वडिलांच्या निधनानंतर घराचा सर्व भार तिच्या खांद्यावर पडला होता. अशा परिस्थितीत सपना दिवसा अभ्यास करायची आणि रात्री स्टेज शो करत असे. अशा स्थितीत मुलं तिची खूप चेष्टा करायचे. सपनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती त्या मुलांना खूप मारायची. सपना अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिच्या चाहत्यांच्या मनात एक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा नेहमीच असते आणि ती म्हणजे स्टेजवर डान्स करताना ती सूट का परिधान करते.

चाहत्यांना असेही वाटते की, तिला कोणीतरी सूट घालण्यास भाग पाडले की काय. या सर्व प्रकरणावर सपनाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. याबद्दल बोलताना सपना म्हणाली होती की, तिने पहिल्यांदा लेहेंगा परिधान केला होता. पण तिने तिचा लेहेंगा पूर्णपणे वेगळा बनवला होता. खरंतर सपनाने स्वतःला झाकून लेहेंगा बनवला होता. पण तिची ही ट्रिक फसली. सपनाने सांगितले की, त्या काळात हरियाणातील ऑर्केस्ट्रामध्ये मुली बॅकलेस लेहेंगा परिधान करत असत. यानंतर सपनाला चांगलेच समजले, तिची ही ट्रिक चालणार नाही.

सपना चौधरीला जेव्हा विचारण्यात आले की, तिने सूट घालणे का निवडले? तर देसी क्वीन म्हणाली की, “ती स्टाईल नव्हती आणि माझ्या आईने मला तसे करायला सांगितले नाही. ते फक्त संरक्षण होते.” सपनाने विचार केला की, तिला अंगभर कपड्यात डान्स केलेलं कोणाला आवडत असेल, तर ठीक आहे किंवा नसेल तरी ठीक आहे. दररोज मिळणारे पेमेंट तिच्यासाठी पुरेसे होते. पण सपनाला माहित नव्हते की, तिचा सूट चाहत्यांना इतका आवडेल. आज हरियाणातील प्रत्येक मुलगी सूट परिधान करून डान्स करते.

सपना चौधरीने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती हरियाणाच्या लगतच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. हळूहळू लोकप्रियता वाढू लागली. सपना चौधरी देखील ‘बिग बॉस ११’ चा भाग राहिली आहे. सपनाने ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. पण सपना म्युझिक व्हिडिओ आणि स्टेजवर सतत धमाल करत आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा