हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या डान्समुळे अनेकदा चर्चेत असते. तिचे फॉलोवर्स केवळ हरियाणापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण देश विदेशातही सपनाचे चाहते आहेत. सपनाने ‘बिग बॉस’मध्ये पाऊल टाकल्यापासून तिला जगभरात ओळख मिळाली. सपना चौधरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सपना नेहमीच चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच सपनाने शानदार फोटोशूट केले आहे. ज्याचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सपनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. सपनाने स्लीव्हलेस सूटसह मॅचिंग दुपट्टा घेतला असून, त्यावर तिने हलका मेकअप आणि मोकळे केस सोडले आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस लूकमध्ये आहे. सपनाची देसी स्टाईल नेहमीच तिच्या चाहत्यांना आवडते. चाहते तिच्या सुंदर लूकचे कौतुक करत आहेत. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम व प्रतिसाद दिला आहे. सपनाच्या या पोस्टवर १.२८ लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सपनाने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती लेहेंगा घालून कार चालवताना दिसत होती. सपना ड्रायव्हिंग करताना ९० च्या दशकातील गाणी देखील ऐकत होती. त्यावेळी कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, “लहानपणीची गाणी.” विशेष म्हणजे सपना काही ना काही कारणाने चर्चेत राहते. बिग बॉस या रियॅलिटी शोमध्ये हजेरी लावल्यानंतर पूर्वी विशेषतः हरियाणामध्ये प्रसिद्ध असणारी सपना पूर्ण देशात प्रसिद्ध झाली. भारताच्या प्रत्येक घरात ओळखली गेली. बिग बॉसपासून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.
नुकतेच सपनाचे ‘बन के चली मोर्नी’ हे गाणे प्रदर्शित झाले. प्रदर्शित होताच या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला. या गाण्याला लाखो व्ह्यूजही मिळाले आहेत. सपनाचे दुसरे गाणे ‘चटक मटक’ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल सपना ‘मौका-ए-वरदत’ हा क्राइम शो होस्ट करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\
-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद