Tuesday, July 9, 2024

‘अब हम ७ में!’ १ तासाची शॉपिंग अन् अवघ्या १५ मिनिटांत लग्न; ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी चढली बोहल्यावर

आपल्या सर्वांसाठी वाढदिवस खूप खास असतो. पण याच वाढदिवशी जर एखाद्याला आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट मिळणार असेल, त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. असेच काहीसे मराठमोळी अभिनेत्री ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीसोबत घडले. मंगळवारी (१८ मे) अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवशी मोठी घोषणा करत, या क्षणाला आणखी खास बनवले आहे. सोनालीने कुणाल बेनोडेकरसह एक फोटो शेअर करत लग्नाची घोषणा केली आहे. ७ मे, २०२१ रोजी हे जोडपे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये, ती रॉयल ब्लू साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. कुणालही त्याच रंगाच्या धोती आणि शेरवानीत देखणा दिसत आहे. हा फोटो शेअर करत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अब हम ७ में.” चाहत्यांनी आता या गोड फोटोवर कमेंट्स करत, या जोडप्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. सोनालीने पोस्ट शेअर करत आशीर्वादही मागितला आहे.

मागच्या वर्षी तिने तिच्या वाढदिवशीच कुणालसोबत साखरपुड्याची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. तर या वाढदिवशी अभिनेत्री चक्क लग्नबंधनात अडकली आहे. १ तासाची शॉपिंग आणि अगदी १५ मिनिटांमध्ये, ४ साक्षीदारांच्या उपस्थितीत लग्न झाल्याचे सोनालीने सांगितले आहे. हे जोडपे आता दुबईमध्ये आहेत, तर त्यांचा हा साधा विवाहसोहळा तिथेच पार पडला आहे. यावेळी सोनाली आणि कुणालच्या आई- वडिलांनी या विवाहसोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली होती. यावेळी लग्नासाठीचे पैसे ते कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही देणार आहेत.

सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे म्हणले, तर कारकिर्दीच्या प्रारंभी तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून तिने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देण्यात आला. सोनाली ती मुळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीनृत्यासाठी साठी विशेष ओळखली जाते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

हे देखील वाचा