Wednesday, February 5, 2025
Home अन्य आहा कडकच ना! सपना चौधरीच्या ‘फटफटिया’ गाण्याचा यूट्यूबवर राडा; मिळाले ‘एवढे’ लाख व्ह्यूज

आहा कडकच ना! सपना चौधरीच्या ‘फटफटिया’ गाण्याचा यूट्यूबवर राडा; मिळाले ‘एवढे’ लाख व्ह्यूज

हरियाणा म्युझिक इंडस्ट्रीमधील डान्सिंग क्वीन सपना चौधरी तिच्या गाण्यांनी आणि परफॉर्मन्सने एक वेगळीच छाप पाडत आहे. त्याच्या नवीन हरियाणवी गाण्याने लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. हेच त्यामागचे महत्वाचे कारण आहे की, लाखो लोक हरियाणवी गाणे पाहत असतात आणि त्यांना ही गाणी खूप आवडतात. त्याचबरोबर सपना चौधरीच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज देखील मिळतात.

इतकेच नव्हे, तर सपना चौधरीने अनेकवेळा आपल्या डान्समधून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता सपना चौधरीच्या नवीन गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Dancing Queen Sapna Choudhary will impress the fans with her dance)

तिचे ‘फटफटिया’ हे हरियाणवी गाणे प्रेक्षकांना खूप आवडले आहे. या गाण्याला एका आठवड्यात यूट्यूबवर ३५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे मनीष शर्माने गायले आहे. त्याचबरोबर आमेन बरोडी यांनी लिहिले आहे, तर अरविंद जांगिड यांनी या हरियाणवी गाण्यासाठी संगीत दिले आहे. सोनोटेक म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेले हे गाणे खूप पाहिले जात आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सपना चौधरीने आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांना वेड लावले आहे आणि ती आपल्या डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमध्ये डान्सच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. यानंतर तिने हळूहळू संपूर्ण देशात आपला डंका वाजवला आहे.

याव्यतिरिक्त तिने ‘बिग बॉस ११’मध्ये ही सहभाग दिसून आली होती. याच शोने तिला संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून दिली होती. सपना जिथे जिथे स्टेज शो करते, तिथे आजूबाजूच्या परिसरातून असंख्य फॅन्स तिला आणि तिचा डान्स बघायला येतात. इतकेच नव्हे, तर तिचा चाहता वर्ग देखील खूपच मोठा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो! ५१.८ डिग्री सेल्सियस तापमानात उर्वशीनं केलं फोटोशूट; व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा