Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘दंगल’ फेम अभिनेत्रीची रस्त्यावरच झाली होती एका व्यक्तीशी गरमागरमी, फातिमाने चापट मारताच, त्यानेही मारली होती बुक्की

‘दंगल’ फेम अभिनेत्रीची रस्त्यावरच झाली होती एका व्यक्तीशी गरमागरमी, फातिमाने चापट मारताच, त्यानेही मारली होती बुक्की

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे ती नेहमीच खूप चर्चेत असते. पण या वेळेस ती तिच्या फोटोंमुळे नाही, तर एका भांडणामुळे सोशल मीडियावर चर्चित आहे. नुकताच तिचा ‘अजीब दास्तां’ हा चित्रपट रिलीझ झाला. त्यादरम्यान तिने एका अनोळखी व्यक्तीसोबत झालेल्या भांडणाचा किस्सा शेअर केला आहे.

फातिमाने सांगितले की, “मी जिमवरून घरी येत होते, तेव्हा रस्त्यावरून जाताना एक व्यक्ती माझ्याकडे सारखा बघत होता. त्यावेळी मी त्याला म्हणाले की, माझ्याकडे काय बघतोय? यावर त्याने उत्तर दिले की, बघणार माझी मर्जी. यावर मी त्याला म्हणाले की, तुला मार खायचा आहे का?? यावर तो म्हणाला की, हो मार.”

त्यांनतर फातिमाने सांगितले की, “मी त्याच्या कानाखाली मारली. त्यांनतर त्याने रागाने वळून माझ्या तोंडावर बुक्की मारली. त्यावेळी मात्र मी बेशुद्ध झाले. मी स्वतःला सांभाळत माझ्या वडिलांना बोलावले, आणि त्यांना माझ्यासोबत झालेल्या या गोष्टीची संपूर्ण माहिती दिली. माझे वडील येताना त्यांच्यासोबत आणखी दोन तीन जणांना घेऊन आले. माझ्या वडिलांना पाहून मात्र तो व्यक्ती खूपच घाबरला आणि पळून गेला. माझे वडील, भाऊ आणि त्यांचे काही मित्र त्याचा पाठलाग करत होते. त्यानंतर ते पुढे येत म्हणाले की, कोण होता तो ज्याने माझ्या मुलीला हात लावण्याचे धाडस केले.”

एका मुलाखतीत फातिमाने सांगितले होते की, “माझे वडील मला खूप सपोर्ट करतात.” यासोबत तिने सांगितले होते की, बाकी लोकांप्रमाणेच तिला कास्टिंग काऊचचे शिकार व्हावं लागलं होतं. फातिमाने बाल कलाकार म्हणून ‘चाची 420’ चित्रपटामध्ये देखील काम केले होते.

याव्यतिरिक्त ती ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘बिट्टू बॉस’ आणि ‘लूडो’ यांसारख्या चित्रपटातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’

-अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

हे देखील वाचा