Friday, April 4, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

तुम्हाला ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम माहीतच असेल. हो तीच ती, जिने दंगलमध्ये मर्दांना देखील धुळ चाखवली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने खूपच कमी वेळात, बॉलिवूड विश्वात मोठी ओळख निर्माण केली होती. पण काही कारणास्तव अभिनेत्रीने अल्पावधीतच बॉलिवूडच्या लाईमलाईटकडे पाठ फिरवली आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. झायरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मात्र ती कधी स्वतःचे फोटो शेअर करत नाही. तर आता बॉलिवूड सोडल्यानंतर पहिल्यांदाच तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

बुरख्यामध्ये दिसली अभिनेत्री
झायरा वसीमने ३० जून २०१९ रोजी, बॉलिवूड कायमचे सोडण्याची घोषणा केली होती. आता बऱ्याच काळानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. अभिनय सोडल्यानंतर झायराने तिचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते. आता झायरा वसीमच्या लेटेस्ट फोटोमध्ये ती एका पुलावर चालताना दिसत आहे. या खास फोटोमध्ये झायराने बुरखा परिधान केलेला दिसत आहे. (dangal girl zaira wasim shared her first photo on instagram have you seen it)

या फोटोमध्ये चाहत्यांना झायरा वसीमचा चेहरा पाहण्याची आस लागली आहे. मात्र या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये. तिने या फोटोला कॅप्शन दिलंय, “द वर्म ऑक्टोबर सन.” झायराचा हा फोटो शेअर होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार पाऊस पाडला आहे.

बॉलिवूडला ‘राम राम’
पोस्ट शेअर करत झायरा वसीमने लिहिले होते की, “पाच वर्षांपूर्वी मी एक निर्णय घेतला, ज्यामुळे माझे आयुष्य बदलले. मी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच माझ्यासाठी लोकप्रियतेचे दरवाजे उघडले. आता मी आज ५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि मला हे कबूल करायचे आहे की, मी या ओळखीवर अर्थात माझ्या कामावर खूश नाही. या क्षेत्राने मला खरोखर खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक दिले आहे. मात्र याने मला अज्ञानाचा मार्गाला नेण्याचे काम केले आहे. मी नकळत ‘इमान’पासून भटकत आहे.” तिच्या या निर्णयाने चाहते खूपच दुःखी झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा