Saturday, July 6, 2024

दर्शन रावलने रियॅलिटी शोबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्यावेळी सॅड स्टोरी आणि ड्रामे नसायचे’

जेव्हा एखादा जवळचा माणूस आपल्याला सोडून जातो किंवा जेव्हा आपल्याला दुःख वाटते, तेव्हा आपण हृदयस्पर्शी गाणी ऐकतो. त्यामुळे त्या सर्व दडपल्या गेलेल्या भावनांना सोडून दिल्यासारखे वाटू लागते. बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीमध्ये हृदयस्पर्शी आणि सुमधूर आवाजात गाणे गाणारे अनेक गायक आहेत. त्यातील एक म्हणजे गायक दर्शन रावल आहे.

प्रसिध्द गायक दर्शन रावल आज तरुणांच्या हृदयाचा ठोका बनला आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. दर्शनने त्याचा प्रवास एका सिंगिग रियॅलिटी शोमधून सुरू केला होता. तो त्याच्या यशाचे सर्व श्रेय या रियॅलिटी शोलाच देतो. दर्शन म्हणतो की, त्याने ज्या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, तो आजच्या शोपेक्षा प्रचंड वेगळा होता. त्यात जास्त ड्रामा किंवा दुख:द कहाण्या नव्हत्या. तो शो सामान्य शो सारखा होता.

दर्शन रावल म्हणाला, “त्या वेळी असे काही नव्हते. ते शो संगीतमय असायचे. मला कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागला नाही. तो एक शानदार शो होता. मला वैयक्तिकरित्या शोच्या माध्यमातून खूप ओळख मिळाली, ज्यामध्ये कोणतीही दुःखद स्टोरी नव्हती. तेव्हा लोकांनी मला केवळ गायक म्हणून पाहिले आणि मला पाठिंबा दिला.” २६ वर्षीय दर्शनने ‘लवयात्री’ आणि ‘मेहरमा’ सारखे ब्लॉकबस्टर गाणे गायले आहेत.

दर्शन रावलच्या म्हणण्यानुसार, या उद्योगात टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तो म्हणाला, “जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये एखादे गाणे मिळाले आणि तुम्ही ते गाता, प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यानंतरही तुम्हाला तुमची मेहनत चालू ठेवावी लागेल. जर तुम्ही हे केले नाही, तर नक्कीच प्रेक्षक तुम्हाला विसरुन जातील. रियॅलिटी शो हे एक मोफत आणि उत्तम व्यासपीठ आहे. तुम्ही तुमच्यातील प्रतिभा घेऊन घरी बसला आहात, त्यापेक्षा लाखो लोकांसमोर तुमची प्रतिभा सादर करणे केव्हाही चांगले आहे.

दर्शन रावलचे मान्सून स्पेशल गाणे ‘जन्नत वे’ नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या इंस्टाग्रामवर हे गाणे शेअर केले. प्रत्येक वेळेप्रमाणे, हे देखील एक सुंदर रोमँटिक गाणे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा