Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ‘तारे जमीन पर’ मधील हा बालकलाकार आठवतो का? वयाच्या २५ व्या वर्षी पाहून ओळखणे होईल कठीण

‘तारे जमीन पर’ मधील हा बालकलाकार आठवतो का? वयाच्या २५ व्या वर्षी पाहून ओळखणे होईल कठीण

काही बालकलाकार असे असतात जे एकच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत असतात. बॉलिवूडमध्ये चित्रपटात अनेक बालकलाकारांनी काम केले. परंतु त्यातील ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ईशान अवस्थी हे पात्र मात्र प्रेक्षकांना चांगलेच भावले. या पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. त्याने आमिर खानच्या विद्यार्थ्याचे पात्र निभावले होते. आता १५ वर्षानंतर अभिनेता दर्शिल सफारी एकदम हॅण्डसम झाला आहे.

दर्शिल सफारी बुधवारी (९ मार्च) रोजी त्याचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या चित्रपटानंतर आता तो खूपच कूल झाला आहे. अनेकवेळा तो त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याला पाहून ओळखणे देखील अवघड होते की, हाच तो ‘तारे जमीन पर :मधील ईशान अवस्थी आहे. जो नेहमीच त्याच्या विचारता मग्न असायचा.

दर्शिलला ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात त्याने डिस्लेक्सिया पीड़त मुलाची भूमिका साकारली होती.या चित्रपटाने त्याचे आयुष्य अगदी बदलून गेले. लहान वयातच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. केवळ त्याचेच नाही तर समाजातील कितीतरी मुलांचे आयुष्य या चित्रपटाने बदलले होते.

त्याने या चित्रपटानंतर अनेक शो आणि मालिकांमध्ये काम केले. त्याला आता त्याच्या ऍक्टिंग करीअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. याची झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिसत असते. दर्शिल सफरीला अगदी कमी वयात ‘तारे जमीन पर’ या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्याने नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या शॉर्ट फिल्मची माहिती दिली आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये तो सुष्मिता सेनची मुलगी रिनीसोबत दिसणार आहे. अनेकांनी त्यांच्या या शॉर्टफिल्मचे कौतुक केले आहे. त्याने अनेक ऍड फिल्ममध्ये देखील काम केले आहे. तसेच अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील तो दिसला आहे. त्याच्या चाहत्यांना आणखी नवीन प्रोजेक्टमध्ये त्याला पाहण्याची इच्छा आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा