Saturday, February 14, 2026
Home बॉलीवूड धक्कादायक! विमानतळावरुन अभिनेत्री निमरत कौरचे सामान चोरीला, ट्विट करत दिली माहिती

धक्कादायक! विमानतळावरुन अभिनेत्री निमरत कौरचे सामान चोरीला, ट्विट करत दिली माहिती

अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा दसवीं चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. ज्यामधील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. पण सध्या निमरत एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली असून अभिनेत्रीचे विमानतळावरुन सामान चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दलचे तिचे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. 

या व्हायरल ट्विटमध्ये अभिनेत्रीवने डेल्टा एयरलाईन्सवर निशाणा साधला आहे. यामध्ये ती म्हणते की “डेल्टा, मला कळवण्यात आले आहे की तुमचे भारतातील ऑपरेशन्स आता चालू नाहीत. ही बाब येथे उपस्थित करून तुमचे लक्ष वेधण्यासाठी आणि या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीचे निराकरण करण्यात मला मदत करा.” रद्द झालेल्या आणि उशीरा झालेल्या फ्लाइटमुळे जवळपास 40 तास चाललेल्या थकवणाऱ्या प्रवासानंतर एअरलाइन्सने मुंबई गाठल्याचा आरोप अभिनेत्रीने केला. तेव्हा तिच्या चेक इन बॅग गहाळ झाल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा –‘टॉलिवूड स्टोरी विकते तर बॉलिवूड स्टार्स विकते’, अभिनेते अनुपम खेर यांचे वक्तव्य चर्चेत
बापरे! एकाच चित्रपटात तब्बल २५ भूमिका साकारणार ‘हा’ दाक्षिणात्य दिग्गज
कॉमेडियन मुनव्वर फारुखी वादाच्या भोवऱ्यात, विश्व हिंदू परिषदेने दिली मोठी धमकी

हे देखील वाचा