Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! ‘मिर्झापूर’मधील ‘या’ अभिनेत्याचे निधन, बाथरूममध्ये ३ दिवस पडून होता मृतदेह

धक्कादायक! ‘मिर्झापूर’मधील ‘या’ अभिनेत्याचे निधन, बाथरूममध्ये ३ दिवस पडून होता मृतदेह

ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर २०१८ साली प्रदर्शित झालेली ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिज आठवतेय का? का नाही आठवणार. या वेबसीरिजमधील प्रत्येक पात्राने आपल्या भूमिकेत जीव ओतून पात्र जिवंत केले होते. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, कोणाला माहिती होते की, मुन्ना भैयाचा खास दोस्त असलेल्या ललितचे पात्र निभावणारा ब्रह्मा अचानकच या जगाचा निरोप घेईल. या बातमीने चाहतेच नाही, तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का दिला आहे.

खरं तर, २९ नोव्हेंबर रोजी ब्रह्माच्या छातीत अचानक दुखत होते. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडून औषध घेऊन तो घरी परतला होता. यादरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनानंतर कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

बाथरूममध्ये पडला होता मृतदेह
हृदयविकाराच्या झटक्याने ब्रह्मा मिश्राच्या निधनानंतर सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्यांचा मृतदेह तीन दिवस घराच्या बाथरूममध्ये पडून होता. तीन दिवसांनी मुंबईतील पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टम करून घेतला. जेणेकरून मृत्यू कधी आणि कसा झाला हे कळू शकेल.

भोपाळवरून आला होता मुंबईत
ब्रह्मा हा मूळचा भोपाळजवळील रायसेनचा राहणारा होता. त्याने रायसेनमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्याचे वडील जमीन विकास बँकेत कार्यरत होते. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आलेला ब्रह्मा मुंबईत स्थायिक झाला होता. मात्र, मुंबईतील आर्थिक संकटाच्या काळात त्याचे वडील आणि मोठा भाऊ संदीप त्याला साथ देत असत.

शेवटचा चित्रपट
ब्रह्माने २०१३ मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०२१ मध्ये तापसी पन्नू विरुद्धचा ‘हसीन दिलरुबा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, ज्यात त्याची छोटीशी भूमिका होती.

ब्रह्माची कारकीर्द
मिर्झापूरशिवाय ब्रह्मा ‘केसरी’, ‘हसीन दिलरुबा’, ‘मांझी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्येही दिसला होता. अलीकडच्या काळात त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले होते. तो बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आला होता, पण ब्रह्म मिश्राचा प्रवास असाच संपणार हे कोणास ठाऊक होते.

ब्रह्माच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तो कायम त्याच्या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात जिवंत राहील, यात शंकाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाआधी झालेल्या प्रीवेडिंग पार्टीत अंकिता आणि विकीने केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

-हॉट कपल असणाऱ्या कॅटरिना आणि विक्की यांच्यामध्ये ‘बार्बी डॉल’ आहे कमाईच्याबाबतीत सर्वात पुढे

-बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा