Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड ब्रेकिंग! प्रसिद्ध गायकाला अटक; बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप

ब्रेकिंग! प्रसिद्ध गायकाला अटक; बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिया सिने सृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायकाला पोलिसांनी अटक केली आहे. गायकावर त्याच्या मैत्रिणीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रसिद्ध ओडिया पार्श्वगायकाला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भुवनेश्वर पोलिसांनी जाजपूर येथून अटक केली आहे. देबेश पाटी असे या गायकाचे नाव आहे. भुवनेश्वरच्या स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार देबेशला अटक करण्यात आली.

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी देबेश पाटीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रसिद्ध ऑलिवूड गायक(Singer) देबेश पाटी याने लग्नाच्या बहाण्याने एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तिला सोडून दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नयापल्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सत्यरंजन प्रधान म्हणाले, “स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार, आम्ही बलात्कार, फसवणूक आणि आयटी कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गायकाला गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. आणि कोर्टासमोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की, देबेश पाटीनेही तिचा गर्भपात करून घेतला. त्यासाठी तिला गर्भनिरोधक गोळ्या देण्यात आल्या. याशिवाय देबेशने तिच्याकडून विविध बहाण्याने 5 लाखांहून अधिक रुपये घेतले. महिलेने लग्नाचा आग्रह धरला तेव्हा देबेशने तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलिसांच्या कारवाईनंतर देबेश पाटीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. यासोबतच गायकाचे दुसऱ्या महिलेसोबतही संबंध असल्याचा आरोप महिलेने केला आहे. ओरिया गायक देबेश पाटी ‘लचक मनी बेबी’, ‘बुलेट गाडी’ आणि ‘शेहजादी’ यांसारख्या इतर अनेक गाण्यांसाठी ओळखला जातो. (Debesh Pati the famous playback singer of Odia cinema was arrested)

आधिक वाचा-
‘बायको म्हणजे गोंधळात टाकणारं…’, प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत; संकर्षण कऱ्हाडे म्हणाला…
‘टायगर 3’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार?, दिवाळीत भाईजानची धमाकेदार एन्ट्री

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा