Saturday, June 29, 2024

गुड न्युज! गुरमीत आणि देबीनाच्या घरी पुन्हा एकदा येणार नवीन पाहुणा, जाणून घ्या एका क्लीकवर

लोकप्रिय जोडी म्हणजे गुरमीत चौधरी आणि देबीना बनर्जी. या जोडीने आपल्या दमदार अभिनयाने टेलिव्हिज क्षेत्रात आपली वेगळीच छाप सोडली आहे. या दोघांच्या लगनाला 11 वर्षे पुर्ण झाले असून यांचे प्रेम जराही कमी झल्यासारखे दिसून येत नाही. हे जोडपे एक आदर्श जोडप्यापैंकी ओळखले जाते काही दिवसांपूर्वी या जोडप्याने एका चिमुकलीला जन्म दिला. त्यामुळे हे जोडपे आपले आई-बाबा होण्याचा आनंद लुटत होते. मात्र, पुन्हा एकदा या जोडप्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

गुरमीत आणि देबीना या जोडप्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे. या जोडप्याला लाखो चाहते फॉलो करत आहेत. सोशल मीडियावर यांचा मोठा चाहता वर्ग असून यांचे फोटो पाहण्यासाठी चाहते वाट पाहत असातात. या दोघांमधील एवढी रोमंटिक केमिस्ट्री पाहून हे जोडपे प्रत्येकाचेच आवडते आहेत. हे जोडपे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाहीत, आता पुन्हा एकदा यांच्या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

देबीना बनर्जीने नुकतंच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पती गुरमीत सोबत कपल डान्स करताना दिसत आहे. मात्र, यामध्ये देबीना प्रेग्नेंट दिसत आहे. या जोडप्याने पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना शेअर केली आहे. चाहते हा व्हिडिओ पाहून खूपच खुश आहेत आणि यांच्या होणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा देत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर धमाल केली आहे. गुरमीतने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे सुट बुट परिधान केला आहे,आणि देबीनाने काळ्या रंगाचा गाउन घालून सिंपला मेकअपमध्ये आपल्या लुकला कंपलिट केले आहे त्यासोबतच तिने घातलेल्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

या व्हिडिओमध्ये दोघेही रोमांटिक पोज देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत असताना देबीनाने लक्षवेधनारे कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जब मैंने तुम्हें पहली बार देखा, तुम मेरी सांसे ले गए. तुम अभी भी हर रोज यही करते हो.” असे भन्नाच कॅप्शन देऊन देबीनाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हे जोडपे जेवढे अभिनयासाठी ओळखले जाते तेवढेच आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी देखिल चर्चेत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बर्थडे सेलिब्रेशन! तेजस्वीनं चक्क आई- बाबांसमाेर करण कुंद्राला केलं किस, पाहा भन्नाट फाेटाे
वाह!’बिग बाॅस’ फेम प्रिया मालिक अडकली लग्न बंधनात, नवऱ्यासाेबत एअरपाेर्टवर झाली स्पाॅट

हे देखील वाचा