Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘हे’ लोकप्रिय कपल लवकरच होणार आईबाबा, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो केला शेअर

मधल्या काही काळात अनेक कलाकार आईबाबा झाले तर काहींनी ते लवकरच आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. टेलिव्हिजनविश्वातील अशा काही जोड्या होत्या ज्या ही गुड न्यूज कधी देतील याची वाट त्यांचे फॅन्स बघत होते. मात्र नुकतीच टीव्ही क्षेत्रातील एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपलने गुडन्यूज दिली आहे. सर्वात रोमँटिक जोडी म्हणून ओळखली जाणारी गुरमीत चौधरी आणि देबीना बनर्जी (Gurmeet-Debina) लवकरच आईबाबा होणार आहे.

सोशल मीडियावर या दोघांनी त्यांचा एक फोटो पोस्ट करत ही गोड बातमी त्यांच्या फॅन्स आणि मित्रांसोबत शेअर केली आहे. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी या दोघांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यात देबीना तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. गुरमीत आणि देबीनाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे घातले असून, देबीनाचे शॉर्ट ड्रेसमध्ये बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले, “आता आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. ज्युनियर चौधरी येत आहे…” त्यांचा हा फोटो आणि ही पोस्ट इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरत असून, ही बातमी आल्यानंतर फॅन्सकडून आणि इंडस्ट्रीमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याफोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील स्पष्ट दिसत आहे.

मौनी रॉयने त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “ओह माय गॉड, माझ्याकडून तुमच्या दोघांना खूप शुभेच्छा. खूप प्रेम आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील.” मौनीसोबतच स्मिता गोंदकर, गौहर खान, मुनमुन दत्ता, दीपिका सिंग, हर्ष लिंबाचिया, करण मेहरा, हंसिका मोटवानी आदी अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गुरमीत आणि देबीनाने अकरा वर्षांपूर्वी एका मंदिरात लग्न केले होते. मात्र देबीनाला एक पारंपरिक बंगाली पद्धतीने लग्न करायचे होते. त्यानंतर २०२१ साली या दोघांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण रितीरिवाजानी पुन्हा लग्न केले. हे दोघं रामायण या मालिकेत एकत्र दिसले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा