Friday, July 5, 2024

अखेर गुरमीत आणि देबीना यांनी त्याच्या लहान मुलीचा दिविशाचा चेहरा आणला जगासमोर

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कपल म्हणजे गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. हे कपल सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत असतात. काही महिन्यांपूर्वीच या दोघांना दुसरी मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव दिविशा ठेवले मात्र तिचा चेहरा अजूनपर्यंत लोकांसमोर आणला नव्हता आता त्यानी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा फोटो शेअर करत तिचा चेहरा दाखवला आहे.

देबीना आणि गुरमीत यांनी डेटिंगनंतर २०११ साली लग्न केले. य दोघांनी टेलिव्हिजनवर रम्यान या मालिकेत राम आणि सीता ही भूमिका देखील साकारली होती. लग्नाच्या तब्बल ११ वर्षानी एप्रिल २०२२ मध्ये ते एका मुलीचे लियानाचे आईबाबा झाले. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुसऱ्यांदा ते एका मुलीचे आईबाबा झाले. तिचे नाव त्यांनी दैवीश ठेवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

देबीना आणि गुरमीत यांची दुसरी मुलगी प्री मॅच्युयर होती. यामुळे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीला बराच काळ लाइमलाईटपासून लांब ठेवले. मात्र आता त्यांनी तिचा चेहरा दाखवला आहे. त्यांनी त्यांचा इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

या फॅमिली फोटोमध्ये देबीना आणि गुरमीत आपल्या दोघी लाडक्या लेकींसोबत दिसत आहे. डेबिनाने छोट्या दिविशाल मांडीमध्ये धरले असून, गुरमीतने लियानाला मांडीमध्ये घेतले आहे. गुरमीत रॉयल ब्लु रंगाच्या कोट आणि पँटमध्ये हँडसम दिसत असून, देबीनाने पर्पल रंगाचा लॉंग गाऊन घातला आहे. लियानाने पिंक तर दिविशाने व्हाईट रंगाचाच फ्रॉक घातला आहे. कपलसोबत त्यांच्या मुली देखील अतिशय क्युट आणि सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “हाय जग! ही माझी जादुई मुलगी दिविशा. गुड वाइब्स. ब्लेसिंग नेहमी.” त्यांच्या या फोटोवर अमाप कमेंट्स येत असून त्यांच्या मुलींचे जोरदार कौतुक होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जितेंद्र जोशींच्या ‘गोदावरी’ सिनेमाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा, SCO फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या दिशाने एथनिक आऊटफिटमध्ये वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा