Friday, June 13, 2025
Home अन्य Breaking | प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू, सोनीपतजवळ झाला अपघात

Breaking | प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू, सोनीपतजवळ झाला अपघात

सिनेसृष्टीतून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) अपघाती मृत्यू झाला आहे. खारखोडा सोनीपतजवळ त्याच्या कारला अपघात झाला, ज्यामध्ये अभिनेत्याला आपले प्राण गमवावे लागले. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही गाडीत होते, जे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्नाल टोल प्लाझाजवळ अभिनेत्याची कार एका कंटेनरला धडकल्याचं सांगण्यात येत आहे. तो स्कॉर्पिओ कारमधून प्रवास करत होता. त्याच्यासोबत त्याची एक मैत्रिणही होती. अभिनेत्याचा मृतदेह खरखोडा रुग्णालयात आहे. तेथून तो सोनीपतला पाठवले जाईल.

गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली, तेव्हा दीप सिद्धू चर्चेत आला होता. त्याचवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वजही लावला. या प्रकरणात दीप सिद्धू याच्यावर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून दीपला धमक्या येत असल्याचं सांगण्यात येत होतं.

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारात ५०० हून अधिक पोलीस जखमी झाले आणि एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीप सिद्धूवर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप होता. जो त्याच्या एका मैत्रिणीने अपलोड केला होता.

मात्र अभिनेत्याच्या अशा मृत्यूने सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा