Monday, July 1, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ हिट अभिनेत्याला निर्मात्यांकडून २.६ कोटींचा गंडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल

बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात दीपक तिजोरीने अभिनेता म्हणून मोठे नाव कमावले पुढे त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील नशीब आजमावले आणि तो यशस्वी झाला. याच बॉलिवूडमधील अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या दीपक तिजोरीला त्याचा सहनिर्मात्या असणाऱ्या मोहन नादरने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. दीपक तिजोरीने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असून, आता पोलीस पुढील तपास करत आहे.

मिळणाऱ्या माहितीनुसार दीपिका तिजोरीने मोहन नादर यांच्या विरोधात आंबोली पोलीस स्टेशनमध्ये धोकाधडीची तक्रार नोंदवली आहे. दरम्यान मोहन नादर यांनी दिपककडून २.६ कोटी रुपये घेतले होते, मात्र त्यांनी ते परत केलेले नाही. दीपक यांनी आरोप केला आहे की, ‘टिप्सी’ नावाचा एक थ्रिलर सिनेमा बनवण्याच्या नावाखाली मोहन नादर यांनी त्यांच्याकडून २.६ कोटी रुपये घेत धोका दिल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत मोहन नादरवर गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार दीपक यांनी १० दिवसांपूर्वीच दाखल केली आहे.

दीपक यांच्याकडून नादर यांनी घेतलेले पैसे शूट लोकेशनसाठी वापरण्याचे सांगत मोहन नाडरने २.६ कोटी रुपये हडप केल्याचे सांगितले जात आहे. दीपक तिजोरी आणि मोहन नाडर यांनी २०१९ मध्ये ‘टिप्सी’ चित्रपटासाठी करार केला होता. याच चित्रपटासाठी दीपककडून २.६ कोटी रुपये मोहनने घेतले पण चित्रपट पूर्ण केला नाही. जेव्हा दीपकने पैसे मागितले तेव्हा मोहनने पेमेंटसाठी दिलेला चेक अनेक वेळा बाऊन्स झाला. त्यानंतर दीपक पोलिसांकडे गेला आहे. मात्र अजूनपर्यंत या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ

कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

हे देखील वाचा