Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! ठाकरे गटाला दगा देत अभिनेत्री गेली शिंदे गटात

आपल्या अभिनय आणि डान्सच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी दीपाली सय्यद हिला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. अशातच अभिनेत्री दीपाली सय्यद ही राजकीय क्षेत्रात चांगलीच सक्रीय आहे. नुकतेच अभिनेत्रीने ठाकरे गटातून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीने बुधवारी (दि. 9 नाेव्हेंबर)ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पाेहचली हाेती. या भेटीआधी अभिनेत्रीने माध्यमांशी बाेलताना ती शिंदे गटात प्रेवेश करत असल्याचे जाहीर केले हाेते. पण मंडळी तुम्हाला दीपाली सय्यद हिचा अभिनेत्री ते राजकारणी हा प्रवास कसा हाेता याविषयी माहित आहे का? चला तर जाणून घेऊया…

अभिनेत्री दीपाली भाेसले सय्यद (Deepali Sayyed) हिचा जन्म 1 एप्रिल 1978 ला बिहारमधील पाटणा येथे झाला, पण दीपालीचे बालपण मुंबईत गेले. दीपालीला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं हाेतं. नृत्याची आवड असलेल्या दीपालीने 2006ला मराठी सिनेसृष्टीत आपल्या करिअरला सुरुवात केली. करीअरच्या सुरुवातील दीपालीने टीव्ही मालिकांध्ये काम केले. याचबराेबर तिने ‘चष्मेबहाद्दूर’, ‘लग्नाची वरात लंडनच्या दारात’, ‘जाऊ तिथे खाऊ’ या दमदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे काैशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.

सण 2008मध्ये दीपाली भाेसले दिग्दर्शक बाॅबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्यासाेबत लग्न बंधनात अडकली. मात्र, लग्नानंतर अभिनेत्री चित्रपटात फारशी दिसली नाही, पण ती अनेक रिऍलिटी शाेमध्ये काम करताना दिसली. मराठी सिनेमा व्यतिरिक्त दीपालीने भाेजपूरी चित्रपटातही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

कालांतराने अभिनेत्रीनं राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. दीपालीने 2014मध्ये अहमदनगरमधून आम आदमी पक्षातून निवडणूक लढवली, पण त्यात तिला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीने शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला हाेता. अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्रीनं काही दिवस आंदोलन केलं. ज्या आंदोलनाची चर्चा बऱ्यापैकी झाली होती. पण त्यानंतर अभिनेत्री राजकारणात फारशी सक्रिय दिसली नाही. मात्र, सण 2009च्या निवडणुकीच्या काळात अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आणि मग काय 2019च्या निवडणुकीदरम्यान अभिनेत्रीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि गटात सामिल झाली.

यानंतर अभिनेत्रीनं ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणुकीसाठी दीपाली सय्यद हिने ‘सोफिया जहांगीर सय्यद’ यानावाने प्रचार केल्यामुळे तिच्यावर नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका करण्यात आली हाेती. आता अभिनेत्रीन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीत केल्याने दीपाली सय्यद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ( deepali sayyed joins eknath shinde faction know all about her career)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दोन मुलांचा बाप असं पुरुषांना का म्हणत नाही?’; ट्रोलर्सना उर्वशीने दिलं सडेतोड उत्तर

सलमानसोबत ‘या’ भारतीय महिला बॉक्सरने रोमँटिक गाणं केलं रिक्रिएटच; म्हणाली,’स्वप्न पूर्ण…’

हे देखील वाचा