बॉलिवूडच्या विश्वात असे अनेक किस्से आहेत, जे पडद्यामागेच राहतात. तथापि, हे किस्से एखाद्या फिल्मी कथेपेक्षा काही कमी नसतात. असेच काही किस्से आहेत, बॉलिवूड अभिनेत्रींच्या भांडणाचे, ज्यांनी बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या. बॉलिवूडमध्ये असे एक-दोन नव्हे, तर बरेच प्रसंग घडले आहेत, जेव्हा अभिनेत्रींच्या भांडणाने सर्वांना चकित केले होते. कधी एकीने दुसरीला चापट मारली, तर कधी काहींनी नाव न घेता एकमेकींना आपले शत्रू ठरवले. चला तर मग अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया, ज्यांची ‘कॅटफाइट’ खूप प्रसिद्ध ठरली होती.
करिश्मा कपूर- रवीना टंडन
नव्वदच्या दशकात करिश्मा आणि रवीना या दोन्हीही अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये खूप जलवा असायचा. तथापि, त्यांच्यामधील कॅटफाइटही जगजाहीर होती. तेव्हा आलेल्या काही वृत्तानुसार, करिश्मा आणि रवीनामधील तणावाचे कारण म्हणजे, अजय देवगन. असे म्हणतात की, दोन्ही अभिनेत्री अजय देवगणवर खूप प्रेम करत असत. एवढेच नव्हे, तर या दोघींनीही एका चित्रपटाच्या सेटवर आपला संयम गमावला आणि विगने एकमेकींना मारहाण केली होती. त्यांच्या भांडणाची कहाणी त्यावेळी बरीच चर्चेत होती.
करीना कपूर- बिपाशा बसू
करीनाला बॉलिवूडची बिनधास्त आणि ‘मीन गर्ल’ म्हणून ओळखले जाते. तिच्या मनात जे असते, तेच तिच्या जिभेवर देखील येते. असे म्हटले जाते की, ‘अजनबी’ चित्रपटाच्या दरम्यान तिचे आणि बिपाशा बसूचे जोरदार भांडण झाले होते. दोघीही अभिनेत्री एकमेकींना पसंत नव्हत्या. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्यातील वाद वाढला, तेव्हा करीनाने बिपाशाला चापट मारली होती. त्यानंतर दोघींनी कधीही एकत्र काम केले नाही. मात्र बऱ्याच वर्षांनंतर या दोघींमधील वाद संपला आणि बिपाशा-करीना एकमेकींना मिठी मारताना दिसल्या.
राणी मुखर्जी- ऐश्वर्या राय
आता राणी आणि ऐश्वर्यामधील वादविवाद असल्याचे दिसत नाही. परंतु एका वेळी या दोघीही एकमेकींना पसंत नसत. चित्रपटांसोबतच दोन्ही अभिनेत्री अभिषेक बच्चनसाठीही एकमेकींशी स्पर्धा करायच्या. ऐश्वर्या अभिषेकची स्टोरी सुरु होण्यापुर्वी राणी अभिषेकने दोन सिनेमे एकत्र केले होते. त्यावेळी त्यांच्यात जवळीक असल्याचे बोलले जात होते. जया बच्चन यांनाही राणी आवडत होती. परंतू पुढे अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न केले व हे नाते कायमचे संपले.
श्रीदेवी- जयाप्रदा
श्रीदेवी आज या जगात नाहीत, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ८०च्या दशकात त्यांच्यात आणि जयाप्रदा यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा व्हायची. या दोघींनी बऱ्याच चित्रपटात बहिणींची भूमिका केली होती. एका मुलाखतीत जयाप्रदा यांनी खुलासा केला की, आज त्या श्रीदेवीला मिस करतात. पण एक काळ असा होता, जेव्हा दोघींना एकमेकींना पाहायला आवडत नव्हते. या दोघींमध्ये भांडणं असण्याच कारण म्हणजे अभिनेता जितेंद्र होय. या दोघींनाही जितेंद्र यांनी बॉलीवूडमध्ये आणलं होतं व एकेवेळी दोघींचही नाव जितेंद्रसोबत घेतलं जायचं.
दीपिका पदुकोण- कॅटरिना कैफ
दीपिकाने कॅटरिनाचे नाव स्पष्टपणे कधी घेतले नाही, पण ती तिला काही खास पसंत करत नाही. माध्यमांमध्ये ही माहिती कधी उघडकीस आली नाही, पण असे म्हटले जाते की, कॅटरिना ही अशी अभिनेत्री होती, जिच्यासाठी रणबीरने दीपिकाला धोका दिला होती. मात्र या गोष्टी विसरून, दीपिकाने तिच्या लग्नात कॅटरिनाला बोलावले होते आणि कॅटरिनासुद्धा तिच्या लग्नात सामील झाली होती.