Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

दीपिका आणि रणवीर यांचा बॉलिवूडमधील सगळ्यात रोमँटिक जोड्यांमध्ये समावेश होतो. दीपिका अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा ती सोशल मीडियावरून करत असते. नुकताच तिचा आणि रणवीर सिंगचा एक रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ बघून दीपवीरचे फॅन्स चकित झाले आहे.

या व्हिडीओला शेअर करत दीपिकाने एक मजेशीर ट्विट देखील केले आहे. त्यांच्या या फोटो सोबतच त्यांचे हे ट्विट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रणवीरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे तर दीपिकाने ग्रीन आणि व्हाईट कलरचा ड्रेस घेतला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर एका दरवाज्यात येऊन उभा राहतो, तिथे नंतर दीपिका येते आणि रणवीरसमोर उभी राहते. तेव्हा त्यांच्यातील सेंसेशनल मुमेंट्स पाहायला मिळतात.

या व्हिडिओला शेअर करत दीपिकाने असे लिहीले आहे की,” रणवीर आपल्याला याशिवाय ‘रिंगा रिंगा रोसेस’ खेळायला पाहिजे ना.” यावर रणवीरने प्रत्युत्तर दिले आहे की, हा नक्कीच आता याला हेच म्हटलं पाहिजे. यावर आलिया भट्टने हसण्याची ईमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच इतर ही खूप कमेंट त्यांच्या या व्हिडीओला येत आहेत.

यासोबतच रणवीरने याच ड्रेसवर दीपिका सोबतचा एक बुमरँग केलेल्या व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात दीपिका रणवीरला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील दीपवीर यांची जामदार केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

हे देखील वाचा