Saturday, July 6, 2024

‘जेवढी मोठी गाडी वापरतेस, तेवढा मनाचा मोठेपणा ही दाखव’, म्हणत नेटकऱ्यांनी दीपिकाला सुनावले खडे बोल…

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्री मानले जाते. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. दीपिकाच्या चित्रपटांसह तिच्या आलिशान राहाणीमानाची चर्चाही सोशल मीडियावर सतत होत असते. कधी कधी कलाकार सार्वजनिक ठिकाणी काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. नुकताच दीपिकाचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तिच्या वागण्याने सोशल तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागत आहे. काय आहे सगळं प्रकरण चला जाणून घेऊ.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर सतत चर्चेत असते, तिच्या फोटोपासून नवनवीन लुक्सची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सतत होते. मात्र जिथे तिचे कौतुक केले जाते तिथेच आता तिला टीकेचा धनी बनवले जात आहे. एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे दीपिकाला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका मुंबई मधील एका रेस्टॉरंट मधून डिनर करून बाहेर येताना दिसत आहे. दीपिका गाडीत बसत यातना तिच्याजवळ कडेवर छोट बाळ घेतलेली एक महिला भीक मागण्यासाठी येते. मात्र ती तिच्या महिलेकडे पूर्णतः दुर्लक्ष करते आणि गाडी जाऊन बसते. तिचा बॉडीगार्ड गाडीचा दरवाजा देखील लगेच लावून घेतो. ती गरीब स्त्री बंद काचेतून दीपिकाला आवाज देण्याचा प्रयत्न करते, परंतु दीपिका तिला कोणताही प्रतिसाद देत नाही. उलट ती गाडीत तशीच बसून राहते. शेवटी ती महिला निराश होऊन मागे होते. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी दीपिकाला चांगलेच ट्रोल केले आहे.

या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, ज्यामध्ये ‘दीपिका पदुकोणला १०० रुपये तरी देता आले असते’, ‘स्वतः पोटभर जेवलीस, त्यांना थोड द्यायच ना’, ‘जेवढी मोठी गाडी वापरतेस तेवढा मोठेपणा मनाचा ही दाखवत जा’ अशा प्रकारचे खडेबोल सुनावले जात आहेत.

दरम्यान काही चाहत्यांनी तिच्या या कृतीच समर्थन सुद्धा केल आहे. आपल्यासारखेच सेलिब्रिटीसुद्धा अशा लोकांकडे दुर्लक्ष करतात असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी ही दीपिका तिच्या बोल्ड फोटोमुळे बरीच चर्चेत आली होती.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा