बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. दीपिका ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी वेगवेगळ्या पात्रांद्वारे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २००५ मध्ये ती पहिल्यांदा हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
अशातच आता दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी (Cannes Film Festival) सज्ज झाली आहे. यावेळी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती L’Oreal ची ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नाही, तर ज्युरी सदस्य म्हणून दिसणार आहे. मंगळवारी (१७ मे) संध्याकाळी अभिनेत्रीने चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (deepika padukone aces a bejewelled look for cannes film festival see photos)
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हिरव्या पँटसह प्रिंटेड ग्रे-ग्रीन शर्टमध्ये समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. तिने हेडबँड आणि चंकी गोल्डन नेकलेस घातला आहे. या लुकसह ती समुद्रकिनारी पोझ देताना दिसली आहे.
प्रत्येक वर्षी कान्स चित्रपट महोत्सव आपल्या मुख्य स्पर्धेद्वारे आठ ज्युरी सदस्यांची निवड करतो. या वर्षी फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन, ज्याने २०१५ मध्ये कान्स येथे ‘द मेजर ऑफ अ मॅन’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जिंकला होता आणि गेल्या वर्षीच्या पाल्मे-विजेत्या टायटनमध्ये अभिनय केला होता, तो अभिनेते आणि दिग्दर्शकांच्या उत्कृष्ट संघासह याची अध्यक्षता करत आहे. यामध्ये दीपिका, रेबेका हॉल, नूमी रॅपेस, असगर फरहादी, जोकिम ट्रियर, लॅडज ली, जेफ निकोल्स आणि जस्मिन ट्रिंका यांचा समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोमवारी (१६ मे) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये पोहोचली आहे. यादरम्यान, अभिनेत्रीने विमानतळावर येताना आणि पुढे काय करायचे, याबद्दल बोलत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा