Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! बॉलिवूडची ‘मस्तानी’ खेळतेय पी. व्ही. सिंधूसोबत बॅटमिंटन, पती रणवीरने दिली मजेशीर प्रतिक्रिया

भारीच ना! बॉलिवूडची ‘मस्तानी’ खेळतेय पी. व्ही. सिंधूसोबत बॅटमिंटन, पती रणवीरने दिली मजेशीर प्रतिक्रिया

बॉलिवूडचे आणि क्रीडा क्षेत्राचे नाते कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे जोडले जातेच. मग ते कोणत्या कलाकाराने खेळाडूची साकारलेली भूमिका असो किंवा मग ते खेळाडू आणि कलाकारांमधील प्रेम संबंध असो. कारण काही असो, बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्र यांचा सहसंबंध नेहमी येत असतो. सध्या असाच काहीसा संबंध आला आहे. मात्र तो थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांना खेळायला खूप आवडते. अनेक कलाकार आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खेळत असतात. सध्या असेच काहीसे झाले आहे.

बॉलिवूडची मस्तानी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच. मात्र तिच्या आणखी एका कलागुणांबद्दल कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल. ते म्हणजे दीपिकाला बॅटमिंटन खेळायला खूप आवडते. इतकेच नव्हे, तर आता ती प्रसिद्ध खेळाडू पीव्ही सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

त्याचबरोबर दीपिकाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दीपिकाने काळ्या रंगाचे आउटफिट घातले आहे. या लूकमध्ये दीपिका एखाद्या खेळाडू प्रमाणेच दिसत आहे. त्याचबरोबर हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन लिहिले की, “माझा रोजचा दिवस कॅलरिज बर्न करताना पीव्ही सिंधूसोबत.”

रणवीर सिंगने दिली मजेदार प्रतिक्रिया
दीपिकाच्या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया ही येत आहेत. प्रतिक्रिया देत एका युजरने विचारले की, “तू पीव्ही सिंधूची बायोपिक करत आहे का?” दीपिकाच्या या पोस्टवर तिचा पती रणवीर सिंगने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने लिहिले की, “मोठा फोमो अटॅक.” यावरून रणवीरला याचा हेवा वाटतोय असे दिसत आहे.

लवकरच ‘८३’ मध्ये दिसणार अभिनेत्री
दीपिका पदुकोण ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या पोस्टमुळे ती बऱ्याचदा चर्चेत येते. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती पती आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा