Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड Deepika Padukone : बॉलिवूड मस्तानीने दिली गुड न्यूज, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

Deepika Padukone : बॉलिवूड मस्तानीने दिली गुड न्यूज, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

बॉलिवूड मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण(Deepika Padukone) हिने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला उधाण आलं होत. दीपवीर जोडीनी या चर्चेला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. दरम्यान, अभिनेत्रीने प्रेग्नेंसीच्या दोन महिन्यानंतर आई होणार असल्याचा खुलासा केला आहे.(Deepika Padukone Ranveer Singh announce pregnancy )

दीपिकाने (Deepika Padukone) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करत डिलिव्हरीच्या तारखेची माहिती दिली. प्रेग्नेंसीची घोषणा करताना तिने सप्टेंबर 2024 मध्ये बाळाचा जन्म होईल अशी माहिती दिली आहे. दीपिकाच्या या पोस्टला काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. सेलेब्ससह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

जेव्हा दीपिका (Deepika Padukone) बाफ्टा अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी दीपिकाचा बेबी बंप पाहिला. यानंतर दीपिका खरोखरच प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली. मात्र, तेव्हा अभिनेत्री आणि तिचा पती रणवीर मौन बाळगले. पण आता दीपिकाने अनोख्या पद्धतीने गरोदरपणाची बातमी जाहीर केली.

author avatar
tdadmin

हे देखील वाचा