Monday, July 8, 2024

रूग्णालयाजवळ स्पॉट झाले दीपवीर; अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या बातम्यांनी इंटरनेटवर धरला जोर

कलाकार लहान असो किंवा मोठा त्यांच्या अवती भोवती मीडियाचा गोतावळा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. कलाकार कधी, कुठं, कसे जातात यापासून ते त्यांचे अफेयर, लग्न, मूल यांपर्यंत सर्व माहित कलाकारांनी सांगण्याधीच मीडियामध्ये आलेली असते. कलाकारांचे जीवन हे त्यांचे वैयक्तिक किंवा खासगी जीवन न राहता, ते सार्वजनिक बनते. बॉलिवूडमधील सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. या दोघांचे फॅन्स फक्त भारतात नाहीतर भारताबाहेर देखील आहेत. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनाच आवडते. या दोघांना लाखो फॉलोवर्स फॉलो करतात. या दोघांबद्दल यामागील काही दिवसांपासून बऱ्याच बातम्या येत आहे.

यातलीच एक मोठी बातमी म्हणजे दीपिकाच्या प्रेग्नन्सीची. दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या मागील काही काळापासून खूपच येत आहे. याबद्दल या दोघांकडून अजून कोणतीच माहिती आली नसली, तरी या बातम्या जोर धरून आहे. दीपिका आणि रणवीरने नोव्हेंबर २०१८ साली इटलीमध्ये लग्न केले. त्यानंतर अनेकदा या दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या आल्या. मात्र यावेळेस या बातम्या जरा जास्तच येत आहे. त्यातच नुकतेच या दोघांना खार येथील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर स्पॉट केले गेले. या दोघांचे या हिंदुजा हॉस्पिटलजवील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल भयानीने शेअर केले आहेत. (Deepika Padukone reached the hospital with husband Ranveer )

ही पोस्ट पाहून आता पुन्हा दीपिका प्रेग्नन्ट असल्याचा प्रश्न विचारला जात आहे. फॅन्सने या पोस्टवर कमेंट करत या दोघांना शुभेच्छा द्यायला देखील सुरुवात केली आहे. काहीजण तर ते हॉस्पिटलमध्ये का गेले असे देखील विचारताना दिसत आहे. या फोटोमध्ये हे दोघं गाडीत बसलेले दिसत आहे. अजूनही या दोघांकडून या फोटोंवर काही उत्तर आले नाही.

दीपिका आणि रणवीरबद्दल सांगायचे झाले, तर या दोघांचे नाते संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ सिनेमापासून सुरु झाले. या सिनेमापासूनच्या यांच्या अफेयरच्या बातम्या यायला लागल्या होत्या. या दोघांनी नेहमीच त्यांचे नाते नाकारले. मात्र पुढे २०१८ साली नोव्हेंबरमध्ये खासगी समारंभात लग्न केले. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा