अभिनेत्री दिपीका पदुकोणचे नाव सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही काम करते. नुकतेच तिच्या अशाच एका ब्रँडच्या जाहिरातीच्या पोस्टरचा फोटो दिग्दर्शक फराह खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पोस्टर बँकॉकमधील आहे, त्यामुळे फराहने दिपीकाबद्दल अभिमान वाटतो, असंही म्हटलंय. त्यावर दिपीकाने मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
दिपीकाने फराहला ‘माँ’ संबोधत म्हटलंय, ‘जेव्हा कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेव्हा तू ठेवलेला.’ त्यावर फराहनेही उत्तर दिलंय की ‘तू तेव्हाही स्टारच होती.’

दिपीकाने फराह खान दिग्दर्शित ओम शांती ओम चित्रपटातून पदार्पण केले होते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)