बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि ‘ब्युटी क्वीन’ दीपिका पदुकोण या दोघांनी पिकू या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा पत्रकार परिषदेेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये दीपिका अमिताभ बच्चन यांच्यावर मजेशीर आरोप लावत म्हणते की, तुम्ही माझे जेवण चोरतात.
व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, पिकू या चित्रपटादरम्यान दीपिका आणि अमिताभ बाकी टीमसोबत एका पत्रकार परिषदेेसाठी आले होते, तेव्हा दीपिका अमिताभ यांच्याबद्दल बोलते की, हे माझे जेवण चोरता. तिच्या या वक्तव्यानंतर अमिताभ तिच्याकडे हैराण होऊन बघत होते.
दीपिका जे काही बोलत होती ते अमिताभ बच्चन यांना काहीच कळत नव्हतं. तिच्या बोलण्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विचारलं की, मी नक्की काय करतो?? यावर तिने परत हेच उत्तर दिले की, तुम्ही माझं जेवण चोरता. यानंतर मात्र तिथे उपस्थित असणारे सगळेजण खूपच हसायला लागतात.
दीपिकाच्या या बोलण्यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात की,” हे बघा कसं आहे ना, आपण दिवसातून साधारण तीन वेळा खाणारी माणसं आहोत. पण दीपिका दर तीन मिनिटाला खात असते. त्यामुळे मी तिचे खायचे पदार्थ लपवून ठेवत असतो. ती सारखं खाते यात काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, एवढं खाऊन पण ही जशीच्या तशी स्लिम आहे.”
त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अमिताभ बच्चन हे इमरान हाश्मीसोबत त्यांच्या ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. सोबतच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात देखील दिसणार आहेत. दीपिकाचा ’83’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. शिवाय ती पहिल्यांदाच ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा
-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी