बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश होतो. तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपटात असो किंवा वैयक्तिक आयुष्यात असो ती नेहमीच तिच्या फॅशन सेन्सला मेंटेन करताना दिसत असते. तिचा कोणत्याही लूकमधील फोटो सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असतात. तिने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर खूपच पसंती मिळत आहे. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची लेदरची पँट आणि क्रॉप टॉप घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूपच आवडला आहे.
दीपिकाने तिचा हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत तिने ड्रेसला शोभतील असे कानातले आणि स्पोर्ट्स शूज घातले आहेत. तिने या फोटोत अगदी हलकासा मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या ड्रेसमधील फोटो खूपच व्हायरल होत आहे.
दीपिकाचे सगळे ड्रेस खूपच महागडे असतात. तिच्या या ड्रेसची किंमत देखील खूप आहे. फोटोत घातलेल्या या पूर्ण ड्रेसची किंमत 91,125 एवढी आहे. त्यातील क्रॉप टॉपची किंमत 19,573 एवढी आहे, तर लेदर पँटची किंमत 71,552 एवढी आहे. तिने घातलेला हा ड्रेस खूपच आरामदायक आहे. कोणताही मेकअप न करता तुम्ही हा ड्रेस घालू शकता. तिच्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून तिला खूपच प्रेम मिळताना दिसत आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिचा पती रणवीर सिंगसोबत ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्या लग्नानंतर त्यांचा हा पहिला एकत्र केलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे, तर दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया हिची भूमिका निभावताना दिसणार आहे. हा चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा










