Monday, July 1, 2024

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत खूपच सजग असतात. निरोगी आणि फिट राहण्यासाठी कलाकार नेहमीच व्यायामाचा आधार घेतात. योगा, जिम, योग्य डाएट घेत कलाकार स्वतःला फिट ठेवतात. व्यायाम हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपण नेहमी कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, त्यांच्या मुलाखती वाचत, ऐकत त्यावरून आपल्या लक्षात येईल की, त्यांना व्यायाम आणि फिटनेस किती प्रिय आहे.

फिटनेस संदर्भातच बॉलिवूडच्या मस्तानीने म्हणजेच दीपिका पदुकोणने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये ती चक्रासन करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती झोपलेली दिसत आहे.

हे पोस्ट करताना तिने लिहिले आहे, “एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी.” तिचे हे कॅप्शन पाहून सर्वांनाच हसायला येत आहे. सोबतच तिच्या या फोटोवरून हे तर समजले की, करिअरसाठी फिटनेस कितीही गरजेचा असला, तरीही खऱ्या आयुष्यात तिला आराम आणि झोप खूप आवडते.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती सध्या ‘पठाण’ सिनेमात व्यस्त असून, या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान, आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ती ‘फायटर’ या सिनेमात ऋतिक रोशनसोबत झळकणार आहे. दीपिका आणि ऋतिक पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शिवाय ती ‘८३’ सिनेमात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.

नुकतेच दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका एका रिसॉटमध्ये दिसत असून त्यांच्या हातात शॅम्पेन ग्लास देखील दिसत आहे. या दोघांच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-दिशा वकानीचा सख्खा भाऊ आहे मयूर वकानी; ‘या’ कारणामुळे तिच्याप्रमाणेच तो देखील आहे शोमधून गायब

-न्यायालयाकडून ‘पंगा क्वीन’ कंगनाला जोरदार झटका; पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला पासपोर्ट नूतनीकरणाचा निर्णय

हे देखील वाचा