Monday, July 1, 2024

स्ट्रगल गर्ल एजे पीएम; वाचा दीपिकाने का म्हटलं अनन्याला पंतप्रधान

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘गेहराइयां’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असून यावेळी घडणारे अनेक किस्से सध्या ऐकायला मिळत आहेत. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनन्या पांडेची सर्वजण अनेकदा थट्टा उडवताना दिसुन आले आहेत. आता पुन्हा एकदा दीपिका पादुकोणने अनन्या पांडेला जोरदार ट्रोल केले आहे, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिध्दांत चतुर्वेदी, आणि धैर्य कारवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गेहराइया’ चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन दीपिका पदुकोणच्या बोल्ड भूमिकेची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वजण या चित्रपटाच्या प्रमोशन करत आहेत. याच दरम्यान एका मुलाखतीत ”सेटवर सर्वात जास्त मोबाइल कोण वापरत,” या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने अनन्याचे नाव घेत तिची चांगलीच फजिती केल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शकांनीही तिला साथ दिली आहे. यावेळी अनन्यानेही उत्तर देताना ”मी माझ्या मोबाइलमध्येच सगळे काम करते” असे स्पष्टीकरण दिले. तिच्या या उत्तरावर दीपिका जोरजोराने हसत ती पंतप्रधान आहे. सगळ जग चालवते अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्रांनीही अनन्याची टर उडवताना ”सगळं इंस्टाग्राम हिच्यामुळेच चालु आहे” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीही एका मुलाखतीत शकुन आणि दीपिकाने अनन्याची जोरदार चेष्टा केली होती. यावेळी अनन्याने एका मुलाखतीत या चित्रपटात काम करण्याआधी मी पॉलिश आणि स्विडिश चित्रपट पाहिल्याच सांगितले होते. तिच्या याच वक्तव्यावर तीची मजा घेताना शकुन यांनी तिला या चित्रपटांची नावे सांगायला लावली. मात्र आता ती लक्षात नसल्याचे उत्तर अनन्याने दिले होते. यावेळी दीपिका निदान एकातरी चित्रपटाचे नाव सांग अस म्हणत अनन्याची चेष्टा केली होती.

चित्रपटातील कलाकार अनन्या पांडेची चेष्टा करत असले तरी दीपिकाने त्यांच्यात प्रेमळ नाते तयार झाल्याचे सांगितले होते. एका मुलाखतीत तिने धैर्यला आपल्या भावासारखा तर अनन्या छोट्या बहिणीसारखी असल्याची भावना व्यक्त केली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा